‘तुझं माझं ब्रेकअप’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मीरा जोशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसह फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही माहिती दिली आहे. सध्या मीराच्या घरी लगीनघाईला सुरुवात झालेली आहे. नुकतेच तिच्या घरी मेहंदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मेहंदी काढतानाचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “हार्दिकरावांचं नाव घेते…”, मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षया देवधरने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासह समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर ३० ऑगस्टला तिने लग्नाची तारीख जाहीर केली. मीरा जोशी प्रसिद्ध कोरिओग्राफर नेहुल वारुळेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या ५ सप्टेंबर दोघेही लग्न करणार आहेत.

हेही वाचा : ‘हे’ आहे राजकुमार रावचं खरं आडनाव, बदलण्याचं कारण सांगत म्हणालेला, “माझ्या नावामुळे खूप…”

लग्न सोहळ्याला काही दिवसच बाकी राहिले असल्याने सध्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरु आहे. मीरा जोशीने मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या सुंदर मेहंदीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : ‘ड्रीम गर्ल २’ च्या कमाईत सहाव्या दिवशी मोठी वाढ, बजेट अवघे ३५ कोटी पण आतापर्यंत कमावले तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मीरा जोशी अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. ‘लाल बत्ती’, ‘युथ’, ‘शिवा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत पोहोचली.