स्व. अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी ‘मिली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी गेली होती. तिच्या वडिलांनी म्हणजे बोनी कपूर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. वडील आणि लेक नुकतेच कपिल शर्माच्या कार्य्रक्रमात येऊन गेले. चित्रपटाच्या बरोबरीने बोनी कपूर यांनी नाव न घेता अक्षय कुमारवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोनी कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. कार्यक्रमात ते असं म्हणाले बॉलिवूडमध्ये असे “काही कलाकार आहेत जे पूर्ण फी घेतात मात्र चित्रपटाचे चित्रीकरण २५ ते ३० दिवसात पूर्ण करतात. सुरुवातीपासूनच त्याचा हेतू योग्य वाटत नाही. मी येथे कोणत्याही अभिनेत्याचे नाव घेत नाही. काही अभिनेते मर्यादित काम करणार आहेत, ते विचारतात किती दिवसाचे काम आहे? त्यांच्या मर्जीनुसार त्यांना अभिनेत्री, दिग्दर्शक उपलब्ध हवेत, मग उत्तम चित्रपट कसे बनणार? ते पुढे असं म्हणाले जर अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांनी सच्चेपणाने काम केले नाही तर चित्रपट हिट कसा होणार? प्रेक्षकांनादेखील तो चित्रपट आवडणार नाही.”

‘बिग बॉस’मध्ये राखी सावंतची वाईल्ड कार्ड एंट्री होणार? म्हणाली, “देशातील जनतेसाठी…”

बोनी कपूर गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत कायर्रत आहेत. वो सात दिन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘क्यूँ… हो गया ना’, ‘बेवफा’, ‘शक्ती’ आणि ‘पुकार’ सारखे चित्रपट दिले आहेत. अभिनेता अनिल कपूर हा त्यांचा भाऊ आहे. बोनी कपूर यांनी श्रीदेवीबरोबर १९९६ मध्ये लग्न केलं. त्यांची मोठी मुलगी म्हणजे जान्हवी कपूर आणि धाकटी म्हणजे खुशी कपूर.

‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतरही तिने ‘गुंजन सॅक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’ अशा विविध चित्रपटातून कामं केली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mili producer boney kapoor slams actor akshay kumar for completing films in 25 30 days spg
First published on: 08-11-2022 at 13:29 IST