मराठी भाषा, मराठी पाट्या यावरून मनसे पक्ष कायमच सक्रिय असतो. आज अनेक ठिकाणी, कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेला डावलण्यात येताना दिसून येते. मात्र मनसे पक्ष कायमच याविरोधात आवाज उठवत असतो. सध्या मनसेने एका प्रख्यात वहिनीला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. मनसेचे अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.

अमेय खोपकर यांनी पोस्टमध्ये असं लिहलं आहे की ‘आगामी प्रो कबड्डी सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क स्टार नेटवर्क यांच्याकडे आहेत. पण हे प्रसारण करताना समालोचनातून मराठी भाषा वगळण्याचा त्यांना हक्क नाही. इतर प्रादेशिक भाषा चालतात मग मराठी का नको’? त्यांनी ट्विटमध्ये याआधीच्या घटनांची उदाहरणे दिली आहे. आयपीएल, सोनी स्पोर्ट्स यांच्याविरोधात अशाच पद्धतीने मनसेने आवाज उठवला होता. तसेच स्टार नेटवर्कला त्यांनी ४८ तासांचा अवधी दिला आहे जर त्यांनी हे मान्य केले नाही तर मनसे आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी प्रचार करूनही निवडणूक हरले होते मुलायम सिंह यादव; दोघांच्या मैत्रीचा खास किस्सा

प्रो-कबड्डी लीगचा हा नववा सीजन आहे. यावेळी स्पर्धेत १२ संघ सहभागी होत आहेत. पहिल्या फेरीत एकूण ६६ सामने खेळवले जाणार आहेत. गट फेरीपर्यंत एका दिवसात दोन ते तीन सामने खेळवले जातील. बेंगळुरू व्यतिरिक्त पुणे आणि हैदराबादलाही होस्टिंग मिळाले आहे. ७ ऑक्टोबरपासून या सीजनला सुरवात झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेय खोपकर यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटालादेखील आपला पाठिंबा दर्शवला होता. अमेय खोपकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत.