शिवानी रांगोळेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने तब्बल २ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका १३ मार्च २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि २५ मे २०२५ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. शिवानीने या मालिकेत अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारली होती. अक्षरा-अधिपतीची जोडी तसेच या मालिकेची खलनायिका भुवनेश्वरी ही सगळी पात्र अल्पावधीतच घराघरांत लोकप्रिय झाली होती.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर सगळेच कलाकार भावुक झाले होते. शिवानीने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आता अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील सासूबाई मृणाल कुलकर्णी यांनी देखील खास पोस्ट शेअर करत शिवानीचं व ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.

गेली २ वर्षे शिवानी या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. त्यामुळे आता मालिका संपल्यावर पुढचे काही दिवस तिला कुटुंबीयांसह वेळ घालवता येणार आहे. लाडक्या सुनेची मालिका संपल्यावर मृणाल कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत तिला मोलाचा सल्ला दिला आहे. जेव्हा एखादी गोष्ट संपते तेव्हाच ती अनेक नव्या गोष्टींना जन्म देते, त्यामुळे वाईट वाटून न घेता आता पुढच्या कामाची नव्या जोमाने तयारी करा असं मृणाल कुलकर्णींनी या पोस्टद्वारे शिवानीला सांगितलं आहे.

मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट

तुम्हाला काम उत्तम मिळतं पण, नेहमीच सहकलाकारांशी, दिग्दर्शकाशी आणि एकूणच टीमशी गट्टी जमतेच असं नाही… ‘झी मराठी’च्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा!’ मालिकेच्या बाबतीत मात्र असं नाही झालं! शिवानी, हृषिकेश आणि माझी मैत्रीण कविता यांनी उत्तम अभिनय आणि मस्त मजा केली. दिग्दर्शक, इतर कलाकारांनी आणि अन्य सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांना उत्तम साथ दिली. शर्मिष्ठा राऊतची ही पहिलीच मालिका पण इतक्या पटकन तिने छान जम बसवला. कल्याणी पाठारेचं विशेष कौतुक. इतक्या समर्थपणे ती झी सांभाळते आहे. मधुगंधा नेहमीच वेगवेगळा आशय आणते हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलं. अनेक पारितोषिकांची लयलूट करून आणि खूप मस्त कौतुक करवून घेऊन या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. आज टीमला नक्कीच वाईट वाटत असेल पण, When one thing ends, it gives birth to so many new opportunities! हे कायम लक्षात ठेवा!! मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !

PS : आता कुठे आमची गुणी सून आमच्या हाती लागणार आहे!! आता मला धडा शिकवला नाही म्हणजे झालं !!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
mrinal kulkarni shivani rangole
मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट

दरम्यान, मृणाल कुलकर्णींच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रत्येकाला अशी पाठिंबा देणारी सासू मिळावी अशा प्रतिक्रिया मृणाल कुलकर्णींच्या पोस्टवर आल्या आहेत.