‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीसने मराठी मनोरंजसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेतील शमिका आणि अभिजीतची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि मालिकेला खूप प्रेम मिळालं. नंतर ‘तू तिथे मी’, ‘हे मन बावरे’ अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

मृणालने त्यानंतर लग्न केलं आणि तिच्या पतीसह ती अमेरिकेला राहायला गेली. ४ वर्षं अमेरिकेत राहिल्यानंतर मृणाल आता भारतात परतलीयं. एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर मृणालला मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायचंय, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. प्रत्येक कलाकाराला त्याचं पहिलं काम खूप खास असतं. पण पहिल्या दिवशी भीती, उत्साह अशा मिश्र भावना कलाकारांच्या मनात असतात.

हेही वाचा… ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन; रंगभूमीवर घेतला अखेरचा श्वास

नुकतीच मृणालने सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत “पहिल्यांदा कॅमेरासमोर उभी राहिलीस तेव्हा मनात काय विचार होते, मनामध्ये धाकधूक होती का? आणि तुला पहिला दिवस आठवतोय का?” असा प्रश्न सुलेखा तळवलकरांनी विचारला असता मृणाल म्हणाली, “हो मला आठवतोय पहिला दिवशी. एकतर ज्यादिवशी माझं शूट होणार होतं त्यादिवशी माझी आई नाशिकला परत जाणार होती. त्याच्या आधी तीन दिवस ती माझ्याबरोबर मुंबईत राहत होती आणि मग ती नाशिकला जाणार होती. मला आधी खूप आत्मविश्वास होता की आपण करू शकतो एवढं काय अवघड नाहीय. एकट वगेरे राहू शकतो. माझी आई त्या एका शॉटनंतर जाणार होती.”

मृणाल पुढे म्हणाली, “माझ्या मनात ते होतं की आता मी काय करू. तो पहिलाच शॉट होता माझा. माझ्या बहिणीने आत्महत्या केली असते आणि तिची आठवण येऊन मला रडायला येत असतं. मी खिडकडे माझा लूक होता आणि माझी तिकडे लांब खिडकीतच उभी होती. मला त्या खिडकीत लूक देऊन मला रडायचं होतं. मी इतकी ढसाढसा रडले असेन की आई जाणार आहे आता.पण ते त्या शॉचसाठी एकदम चपखल बसल भावना बघता. असा तो शॉट माझ्या लक्षात आहे आणि त्यानंतर आईपण गेली माझी. तो एक दिवस माझ्या लक्षात आहे. बालाजीची माझी पहिलीच फिल्म होती ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ आम्ही सगळेच नवखे होते मी अभिनजीत वगैरे. तेव्हा प्रोफेशनली कॅमेरासमोर मी पहिल्यांदाच अभिनय करत होते. त्यामुळे धाकधूक तर होतीच.”

हेही वाचा… “माझ्या बारीक मित्रा तुझी खूप…”, ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ फेम मंदार चांदवडकरांची कवी कुमार आझाद यांच्या आठवणीत खास पोस्ट, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मृणाल दुसानीस, तिच्या कुटुंबासह भारतात परतली आहे. मृणालच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, मृणालने २०१६ रोजी नीरज मोरेबरोबर लग्नगाठ बांधली. नीरज सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. नीरज आणि तिचं अरेंज मॅरेज झालं होतं. २४ मार्च २०२२ रोजी मृणालने गोंडस मुलीला जन्म दिलं. दोघांनी मुलीचं नाव नुर्वी असं ठेवलं.