‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे अभिनेत्री गौतमी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. आपली मोठी बहीण मृण्मयीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. सध्या अभिनेत्री रंगभूमीवरील ‘गालिब’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामध्ये ती अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर प्रमुख भूमिका साकारत आहे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यात आज गौतमी तिचा ३१ वाढदिवस साजरा करत आहे.

गौतमी देशपांडेवर वाढदिवसाच्या निमित्ताने आज मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तिच्या लाडक्या मोठ्या बहिणीने देखील खास व हटके पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मृण्मयीने गौतमीबरोबरचा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये मृण्मयी बर्थडे गर्लला प्रचंड त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या यशानंतर शर्मिष्ठा राऊत करणार नव्या मालिकेची निर्मिती! ‘झी मराठी’ने शेअर केला खास प्रोमो

मृण्मयी व गौतमी या देशपांडे बहिणींची कलाविश्वात नेहमीच चर्चा असते. या दोघीही एकमेकींबरोबरच्या भांडणांचे गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आज गौतमीच्या वाढदिवसानिमित्त मृण्मयीने असाच एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये गाढ झोपलेल्या गौतमीला मृण्मयी प्रचंड त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहे. बहिणीची झोपमोड करताना मृण्मयी Happy Birthday बोलून तिला शुभेच्छा देत आहे. परंतु, एवढा त्रास देऊनही गौतमी शेवटपर्यंत झोपेतून उठत नाही.

हेही वाचा : “माझ्या घरीसुद्धा नगरपालिकावाले आले होते,” जात सर्वेक्षणाबद्दल शरद पोंक्षेंचे विधान; म्हणाले, “मी ब्राह्मण आहे, मला…”

मृण्मयी गौतमीला त्रास देत असल्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी देशपांडे सिस्टर्सच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय गौतमी लिहिते, “यासाठी मला न्याय हवाय! घरातल्या धाकट्या भावडांनी कृपया कमेंट्समध्ये आपली मतं मांडा. थँक्स पण, नो थँक्स ताई!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौतमी देशपांडेला मृण्मयीप्रमाणे तिचा पती स्वानंद तेंडुलकरनेही खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच स्वानंदने लाडक्या बायकोला वाढदिवशी छानसं व्हायोलिन गिफ्ट दिलं आहे.