मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक म्हणून प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनला ओळखले जाते. गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. चिपळूणमध्ये दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

मुग्धा-प्रथमेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. आता लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश पुन्हा कामावर परतले आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे दोघांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर दोघांनी उत्तर प्रदेशातील बिठूर येथे गंगा नदीचे दर्शनही घेतले. दोघांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअरही केले आहेत.

परतीचा प्रवास करताना मुग्धा व प्रथमेशने लखनऊचा दौराही केला. दरम्यान, त्यांनी लखनऊमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या आलू टिक्की, छोले, पाणीपुरी अन् मिठाईचा आस्वाद घेतला. लखनऊची खाद्यसफर करताना त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन तेथील खास पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतर प्रथमेश व मुग्धा एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत.

हेही वाचा- “अधिपतीला अक्कल…” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक नाराज; म्हणाले, “बायकोवर विश्वास नाही अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मधून मुग्धा व प्रथमेश घराघरांत पोहोचले. गेल्या वर्षी दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हापासून दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. दोघांच्या ग्रहमखपासून हळदीपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अत्यंत साध्या आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या लग्नापूर्वीचे विधी पार पडले.