Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Pre Wedding Rituals : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या घरी लग्नविधीला सुरुवात झाली असून नुकताच त्यांचा ग्रहमख सोहळा पार पडला. गायिकने या सोहळ्याचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

लग्नापूर्वी घरात ग्रहमख विधी करण्याची पद्धत असते. या विधीमागे मंगल कार्याला नवग्रहांची अनुकूलता मिळविणे हा उद्देश असतो. या सोहळ्यासाठी मुग्धाने खास निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी हा विधी घरच्या घरी करण्यात येतो. याचे काही खास फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गायिकेच्या घरी लग्नानिमित्त फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळालं.

हेही वाचा : Premachi Goshta: मुक्ता-सागरच्या लग्नसोहळ्याला सायली-अर्जुनची हजेरी, दोन्ही जोडप्यांचं आहे खास नातं

मुग्धा-प्रथमेशने मराठी प्रथा व चालीरितींनुसार लग्न केल्यामुळे सध्या नेटकरी दोघांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये “याला म्हणतात अस्सल मराठमोळं लग्न, किती साधेपणा, सगळ्या आपल्या चालीरीती” असं म्हटलं आहे. तर, आणखी काही युजर्सनी “किती गोड, सालस”, “नवरी नटली” अशा कमेंट्स करत मुग्धा-प्रथमेशला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’मधील बॉबी देओलचं पात्र मुस्लीमच का? दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा म्हणाला, “कुणालाच हिंदू धर्मात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुग्धा-प्रथमेशच्या ग्रहमख विधीला कुटुंबीय व जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. दरम्यान, या दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल थोडक्यात सांगायचं, झालं तर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये या दोघांनी एकत्र सहभाग घेतला होता. त्यानंतर काही वर्षात शोच्या निमित्ताने दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. आता येत्या दोन दिवसांत दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.