‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अभिनेत्री नम्रता संभेराव हिला एक वेगळी ओळख मिळाली. आज तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये नम्रता साकारत असलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसवतं. तर आता तिच्या काही फोटोंमुळे नेटकऱ्यांना थेट विराट कोहलीच आठवला आहे.

नम्रता सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. आता नुकतेच तिने तिचे बालपणीचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत एक ट्रेंड वायरल होऊ लागला आहे तो म्हणजे त्यांचे २५ वर्ष जुने फोटो पोस्ट करण्याचा. याच ट्रेंडला फॉलो करत नम्रताने देखील तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

आणखी वाचा : Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाठोपाठ नम्रता संभेराव आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज, प्रोमो व्हायरल

या फोटोमध्ये नम्रता अगदी चार-पाच वर्षांची दिसत आहे. केसांचा बॉयकट, मोठे व बोलके डोळे, कपाळावर टिकली आणि सुंदर पारंपारिक ड्रेस परिधान करून ती फोटोंसाठी पोज देताना दिसत आहे. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेमुळे आम्हांला आणि तुम्हांलाही ९० च्या काळात नेलं तर हा आहे माझा १९९७ मधील फोटो. तुम्हीही तुमचा १९९७ मधील फोटो पोस्ट करा सोनी मराठी वाहिनीला टॅग करा आणि #PostOfficeUghadAahe हा हॅशटॅग वापरा. २ एप्रिल, रविवार रात्री ९ वा. चुकवू नका ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’चा शेवटचा भाग,” असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं.

हेही वाचा : “मेरे आंखों में मत झांको…” नम्रता संभेरावची ‘लॉली’ पाहून सासूबाईंची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना विराट कोहलीची आठवण झाली. विराट कोहली देखील लहानपणी असाच दिसायचा असा अनेकांनी कमेंट करत म्हटलं. एकाने लिहिलं, “विराट कोहली”, तर दुसरा नेटकरी म्हणाला, “मला आज समजलं पावली लवली कोहली स्केट तू का करतेस. तू सेम विराट कोहली सारखीच दिसायचीस.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “हा तर विराट कोहली!” त्यामुळे आता तिचे हे फोटो खूप चर्चेत आले आहेत. तर अनेकांनी ती खूप छान आणि क्युट दिसायची असंही नम्रताला सांगितलं.