‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेत सध्या एजे व लीला यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळत आहे. गेले अनेक दिवस फक्त लीलाच एजेच्या प्रेमात होती, मात्र आता एजेदेखील लीलाच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. एजेले तो लीलावर प्रेम करत असल्याची जाणीव झाली आहे. लीलाने तिच्या अल्लड पण प्रेमळ स्वभावाने एजेच्या मनात तिची जागा निर्माण केली आहे. आता मालिकेत त्यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

एजे-लीलामधील अंतर कमी होणार

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दुर्गा एजेकडे आणि त्याला एक कागद देत म्हणते, “ही न्यू इअर पार्टीची गेस्ट लीस्ट केली आहे.” एजे तिला म्हणतो, “दुर्गा याची काहीच गरज नाही. या वर्षीची नवीन वर्षाची पार्टी मी घरीच देणार आहे.” त्यानंतर या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, विश्वरूप एजेच्या हातात एक बॉक्स देतो. एजे तो बॉक्स उघडून त्यातील लॉकेट हातात घेतो. ते लॉकेट उघडल्यानंतर त्यामध्ये एजे व लीलाचा फोटो दिसतो. एजे मनातल्या मनात म्हणतो, “या वर्षीची पार्टी लीलासाठी स्पेशल करायची आहे.” दुसरीकडे लीला लॅपटॉपसमोर बसली असून ती स्वत:शी म्हणते, “आता बघाच एजे, माझी थीमच सगळ्यात बेस्ट असणार, तुमची माझ्यावरून नजरच हटणारच नाही.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने, “मनातल्या गोष्टी ओठांवर येणार का? अभिराम आणि लीला एकत्र येणार का ?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, एजे लीलाबरोबरचे हे दुसरे लग्न आहे. एजेपेक्षा लीला वयाने लहान आहे. वेंधळेपणा करणारी, थोडी अल्लड व धडपडी अशी लीला आहे. स्वत:च्या कुटुंबावर अतोनात प्रेम करणारी लीला एजेच्या प्रेमात पडली आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असणारा, कडक शिस्तीचा एजे हा अजूनही त्याच्या पहिल्या पत्नीवर प्रेम करताना दिसतो. आता मात्र एजे व लीला यांच्यातील अंतर कमी होताना दिसत आहे. एजे लीलाच्या प्रेमात पडल्याचे त्याने स्वत:शी मान्य केले आहे. न्यू इअर पार्टीमध्ये एजे लीलाला त्याच्या मनातील भावना सांगणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. प्रेक्षकही एजे व लीला यांच्यातील ही लव्ह स्टोरी पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: बॉलीवूड गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला एकेकाळी म्हटले जायचे पणवती; प्रसिद्ध दिग्दर्शकांचा खुलासा, म्हणाले, “वेडा झाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता नवरी मिळे हिटलरलामध्ये पुढे नेमके काय होणार, दुर्गा व किशोर एजे व लीलामध्ये फूट पाडण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.