‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून एजे-लीलाची हटके लव्हस्टोरी सर्वांना पाहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत एजेची पहिली बायको अंतराची एन्ट्री झाल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळाला. या मालिकेत अंतराची भूमिका अभिनेत्री माधुरी भारतीने साकारली होती.

आता ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असतानाच माधुरी भारतीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत वर्णी लागली आहे. याबद्दल अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

माधुरी भारती ‘प्रेमाची गोष्ट’, ‘लग्नाची बेडी’ अशा छोट्या पडद्यावरच्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत तिने एजेची पहिली पत्नी अंतराची भूमिका साकारली होती. अंतराचं निधन झालेलं असतं पण, जेव्हा एजे-लीलाचं प्रेम खऱ्या अर्थाने बहरत जातं तेव्हाच अंतरा अचानक जहागीरदारांच्या घरी येते असा सीक्वेन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मात्र, हा सगळा किशोरचा डाव असतो त्यामुळे सगळं सत्य उघड होऊन येत्या काही दिवसांत या मालिकेचा शेवट गोड होणार आहे.

लीलाच्या डोहाळेजेवणात अंतरा तिची प्रेमाने काळजी घेत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका लवकरच संपेल. पण, त्याआधीच अंतराची भूमिका साकारणाऱ्या माधुरी भारतीची दुसऱ्या मालिकेत एन्ट्री झाली आहे.

आता अभिनेत्री माधुरी भारती ‘स्टार प्रवाह’च्या ‘शुभविवाह’ या मालिकेत झळकणार आहे. ही मालिका दुपारी २ वाजता प्रसारित केली जाते. दुपारच्या स्लॉटला प्रसारित होत असूनही ‘शुभविवाह’ मालिकेचा टीआरपी चांगला आहे. “नवीन लूक, नवीन भूमिका… आजपासून ‘स्टार प्रवाह’वर शुभविवाह मालिकेत येतेय. भेटुया…” अशी पोस्ट शेअर करत माधुरीने तिच्या नव्या भूमिकेविषयीची माहिती सर्वांना दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
madhuri bharti
माधुरी भारतीची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री

दरम्यान, ‘शुभविवाह’ मालिकेत यशोमन आपटे आणि मधुरा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अभिनेत्री विशाखा सुभेदार या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.