Navri Mile Hitlerla Fame Actress Vallari Viraj : ‘नवरी मिळे हिटलरला’ या लोकप्रिय मालिकेने मे २०२५ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेता राकेश बापट यांची फ्रेश जोडी एकत्र झळकली होती. जवळपास वर्षभर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ही मालिका संपली. वल्लरीने यामध्ये लीला ही भूमिका साकारली होती, तर राकेशला या सिरिलयमुळे सर्वत्र एजे ही नवीन ओळख मिळाली.

‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराज सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडीओ चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. मालिका संपल्यावर वल्लरी सध्या काय करतेय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. अभिनेत्री नुकतीच पुण्याला गेली होती. पुण्यात मनसोक्त फिरतानाचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वल्लरीने “Dayout वगैरे” असं कॅप्शन देत तिच्या पुणे भ्रमंतीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेत्री सुंदर तयार होऊन घराबाहेर पडत असल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर ती स्कुटीवरून फिरताना दिसतेय. पुण्यात गेल्यावर वल्लरीने सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. याठिकाणी ती मांजरीसह खेळताना देखील दिसली.

या व्हिडीओमध्ये वल्लरी पुढे, केळीच्या पानावर सर्व्ह केलेल्या डोशाचा आस्वाद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या व्हिडीओमध्ये शेवटी तिने पुण्यात शॉपिंग देखील केल्याचं दिसतंय.

वल्लरीच्या पुणे भ्रमंतीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूपच Cute आहेस तू”, “तुझी मालिका प्रचंड मिस करतो”, “मस्तच व्हिडीओ बनवला आहेस”, “क्युटनेस ओव्हरलोड”, “वल्लरी माझी फेव्हरेट”, “तू खूपच सुंदर दिसतेय”, “अगं किती गोड व्हिडीओ आहे”, “तुझे असे व्हिडीओ आम्हाला खूप आवडतात एकदम पॉझिटिव्ह Vibes देतात” अशा प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेनंतर वल्लरी विराज नव्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार हे पाहण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक आहेत.