Navri Mile Hitlerla fame Vallari Viraj shares video: कठीण काळात कोणाची तरी साथ असेल तर आलेल्या संकटातून मार्ग काढणे सोपे जाते. परिस्थितीवर मात करून नवीन संधी शोधण्यासाठी मनाची तयारी होते. अडचणीच्या काळात साथ देणारी माणसं आयुष्यभर लक्षात राहतात. आता अशाच आशयावर आधारित दोन लोकप्रिय अभिनेत्रींनी सादरीकरण केले आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’फेम अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ दोघी कायमच त्यांच्या डान्स व्हिडीओंमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आगळ्यावेगळ्या संकल्पना आणि अफलातून डान्स स्टेप्स यांमुळे त्यांच्या अशा व्हिडीओची मोठी चर्चा होताना दिसते.
आता वल्लरी विराजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इन दिनों हे गाणे ऐकायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की त्या दोघींच्या आयुष्यात काहीतरी बिनसले आहे. त्यामुळे त्या दोघी हरलेल्या दिसतात. त्यांना स्वत: विषयी तिरस्कार वाटायला लागतो. त्या एकट्या पडलेल्या दिसतात. पण जेव्हा त्यांना एकमेकांचे दु:ख दिसते, तेव्हा त्या एकमेकींना धीर देतात. एकमेकींना साथ देतात आणि आनंदी राहण्याविषयी सांगतात.
जेव्हा त्या स्वत:ची प्रतिमा आरशात बघतात, तेव्हा त्यांना त्या आवडत नाहीत. पण जेव्हा त्या एकमेकींनी दाखवलेल्या आरशात स्वत:ला पाहतात, तेव्हा त्यांना स्वत:ला आवडतात. त्या जगाकडे पुन्हा सकारात्मकतेने पाहायला सुरू करतात. नव्या संधी, नव्या आव्हानांना सामोरे जाण्यास तयार होतात. एकही शब्द न बोलता त्यांनी खूप सुंदर संदेश त्यांच्या सादरीकरणातून दिला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना, वल्लरीने लिहिले, “जेव्हा तुमच्या आयुष्यात मित्र मैत्रीणी असतात, तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे होते.” आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत वल्लरी व आलापिनी यांचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले नेटकरी?
“कमाल”, “वल्लरी व आलापिनी जरी तुम्ही एका कुटुंबात जन्म घेतला नसला तरी तुम्ही मनाने बहिणी आहात”, “तुम्ही दोघी कमाल आहात”, “खूप छान”, “क्यूट हावभाव”, “एक्सप्रेशन क्वीन्स”, “किती सुंदर हावभाव”, “खूप छान”, “किती सुरेख”, “जबरदस्त केमिस्ट्री”, “तुमच्यातील बॉण्डिंग खूप छान आहे”, अशा अनेक कौतुक करणाऱ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.



दरम्यान, वल्लरी विराज व आलापिनी निसळ यांना एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता त्या आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.