Vallari Viraj Shares Photo Raqesh Bapat: आवडत्या मालिका निरोप घेणार असतील, तर प्रेक्षकांना वाईट वाटते. कारण- दररोज टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलेल्या असतात. मालिकेतील पात्रांबरोबर त्यांचे एक वेगळे नाते तयार झालेले असते.
वल्लरी विराज व राकेश बापटचा ‘हा’ फोटो पाहिलात का?
आता या मालिकेत लीलाच्या भूमिकेत दिसणाऱ्या वल्लरी विराजने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. आता हा फोटो लक्ष वेधून घेत आहे. वल्लरी विराजने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये दोन फोटो एकत्रित करण्यात आल्याचे दिसत आहे. या फोटोत तिच्याबरोबर अभिनेता राकेश बापट दिसत आहे. राकेश बापट व वल्लरी हे लीला व एजेच्या वेशभूषेत दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. हा फोटो शेअर करताना वल्लरीने, “शूटिंगचे शेवटचे काही दिवस”, असे लिहिले आहे. तसेच, तिने राकेश बापटला टॅगदेखील केले आहे.
नवरी मिळे हिटलरला या मालिकेत राकेश बापट हा एजे ऊर्फ अभिराम जहागीरदारच्या भूमिकेत दिसत आहे. कडक शिस्तीचा, गोष्टी परफेक्ट असाव्यात, असा अट्टहास असणारा, जितका रागीट तितकाच प्रेमळ, आईवर जीवापाड प्रेम करणारा, कुटुंबावर माया करणारा, लीलाला जीव लावणारा, पहिल्या पत्नीला न विसरणारा, असा हा एजे प्रेक्षकांचा लाडका आहे. त्याचा रुबाबदारपणा प्रेक्षकांना भुरळ घालतो.

एजेची दुसरी पत्नी लीला आहे. लीला ही एजेपेक्षा वयाने लहान आहे. गोंधळ घालणारी, उत्साही, थोडी बेशिस्त अशी ही लीला सर्वांची काळजी घेते. ती बिनधास्तपणे मनातल्या भावना व्यक्त करते, मनमोकळेपणाने बोलते. प्रामाणिकपणाने नाती जपते. त्यामुळे लीला प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजे व लीलाबरोबरच रेवती, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, किशोर, आजी, लीलाचे आई-बाबा, विराज, प्रमोद, यश, अंतरा ही सगळीच पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. त्यामुळे नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे.