‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. तर या मालिकेमध्ये वरचेवर नवनवीन वळणं येत असतात. पण सध्या या मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅकमुळे प्रेक्षक वैतागले आहेत.

आणखी वाचा : सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमध्ये पोहोचली ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’तील लॉली, जेवणाचा आस्वाद घेऊन म्हणाली, “मेरे आँखों में मत झांको पर…”

सध्या या मालिकेमध्ये आनंदीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याचं तिला कळतं. पण नुकतंच तिचं बाळ जातं आणि ती यापुढे कधीही आई होऊ शकणार नाही असं डॉक्टर त्यांना सांगतात. पण हे समजल्यानंतर काही महिन्यांपूर्वी मालिकेतून एक्झिट घेतलेली रमा खूप दुःखी होते आणि मला आनंदीच्या पोटी जन्म घेऊ दे असं स्वर्गातून चित्रगुप्ताला सांगते. याची एक छोटी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर त्यावर कमेंट करत प्रेक्षक विविध प्रतिक्रिया देत आहेत.

https://fb.watch/nsVljzCzIx/?mibextid=Nif5oz

हेही वाचा : “तुम्ही दोघं…,” अपूर्वा नेमळेकरने दिली तेजश्री प्रधान व राज हंसनाळेमधील केमिस्ट्रीवर प्रतिक्रिया, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी या मालिकेतील कथानकावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. एकाने लिहिलं, “चांगली मालिका होती पण वाट लावलीय आता…भारत चंद्रावर पोहचलाय आणि यांनी चित्रगुप्ताला कॅामप्युटरचा डबा घेऊन आणलाय. चुकीचा संदेश देणाऱ्या मालिका बंद करायला हव्यात.” तर दुसरा म्हणाला, “काय तो चित्रगुप्त… कसल त्याचं ऑफिस… प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहतात.” तर तिसऱ्याने लिहिलं, “कथानक भरकटल आहे, उगीच त्या भुटनीला परत आणलं आहे.” तर आणखी एक जण म्हणाला, “काय मूर्खपणा चाललाय…प्रेक्षकांना काय बावळट समजला का? बंद करा सिरीयल बास झालं.” त्यामुळे आता या मालिकेच्या ट्रॅकवर प्रेक्षक चांगलेच वैतागले आहेत.