Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील आठव्या आठवड्यात घरातील समीकरणं बदलेली पाहायला मिळाली. कोणी कोणाशी गद्दारी केली तर कोणी थेट आपला ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलं. पण सर्वात रंजक ठरला कॅप्टन्सीचा टास्क. हा टास्क अरबाज पटेलने जिंकला आणि तो कॅप्टन झाला आहे. पण आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणकोणत्या सदस्यांची शाळा घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात निलेश साबळेची एन्ट्री झाली आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक निलेश साबळे आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पाहायला मिळणार आहे. पत्रकारांच्या सणसणीत प्रश्नांबरोबर निलेश साबळेच्या देखील तिखट प्रश्नांची उत्तर घरातील सदस्यांना द्यावी लागणार आहेत. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

हेही वाचा – Video: धनंजय पोवारची ‘ती’ कृती पाहून भारावल्या आई आणि पत्नी, ‘बिग बॉस’ना सुचवला एक नवा टास्क

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ निलेश साबळेचं घरात स्वागत करताना दिसत आहेत. बिग बॉस म्हणतात, “आपल्या खास शैलीत इजेक्शन द्यायला येणार आहे डॉ. निलेश साबळे.” त्यानंतर निलेश साबळे घरातील सदस्यांना हटके अंदाजात तिखट प्रश्न विचारताना दिसत आहे. निलेश विचारतो, “घरात कोण असा काकाकुवा आहे ज्याला तुम्ही अजून ओळखू नाही शकला? कोण चायनिज कोथिंबीर आहे जिला तुम्हाला बाहेर काढवासं वाटतं? जान्हवी, जर बंदूक तुमच्या हातात दिली तर कोणावर निशाणा साधालं?” निलेशचे हे तिखट प्रश्न ऐकून सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “प्रचंड हुशारीने गेम खेळतोय”, अरबाजचं कौतुक करत मराठी अभिनेत्याचा पंढरीनाथ, अंकिता आणि डीपीला सवाल, म्हणाला, “असा गेम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी निक्की संदर्भात अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “निक्की व अरबाज बेडसीन कमी करा जरा…लहान मुलही कार्यक्रम बघतात.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “निक्की जिंकणार आहे.” अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.