‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर मध्येच या कार्यक्रमातून एक्झिट घेऊन तो ‘फु बाई फु’ या कार्यक्रमामध्ये आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटामध्येही झळकला. तर आता तो ‘करून गेलो गाव’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या कामाबरोबर असतो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. तर आता त्याने त्याच्या आयुष्यातील प्रेमाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे ओंकारचा चाहतावर्ग खूप वाढला. ओंकार देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे ते पोस्ट च्या माध्यमातून तो चहा त्यांची शेअर करत असतो. आता ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने प्रेमाबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज
या मुलाखतीत ओंकारला प्रेमाबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, “प्रेम हे ठरवून होत नाही आणि मला ते कधी झालंही नाही. मी पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टींमध्ये पडत नाही. माझ्या आयुष्यातील या गोष्टीची सगळी जबाबदारी माझ्या घरच्यांनी आणि मित्रमंडळींनी घेतली असल्यामुळे त्याचा विचार करण्याची आता काही गरज नाही.”
ओंकारचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. तर यावर त्याचे चाहते विविध प्रतिक्रियाही देत आहेत.
