Paaru and savalyachi Janu Savali Upcoming Twist: ‘सावळ्याची जणू सावली’ व ‘पारू’ या दोन्ही मालिका लोकप्रिय आहेत. या मालिकांतील सावली व पारू या दोन्ही अभिनेत्री प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. सध्या या मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे.
सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ व ‘पारू‘ या मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. पारू व सावली या दोघी मैत्रिणी आहेत. दोघीही आपापल्या घराच्या हिताचा विचार करताना दिसतात. सावलीला मेहेंदळेंच्या घराप्रति तर पारूला किर्लोस्करांप्रति आस्था असलेली दिसते. आता तिलोत्तमा व अहिल्यादेवी या दोघीदेखील मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळते.
आता या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. सावळ्याची जणू सावली मालिकेत सावलीचा आवाज गेल्याने तारा स्वरयज्ञ या स्पर्धेत जिंकू शकली नाही. तारा व भैरवीला जगन्नाथने याआधीच आव्हान दिले होते. तारा या स्पर्धेत जिंकू शकणार नाही अशी चेतावणी त्याने दिली होती, कारण तारा ज्या आवाजामुळे प्रसिद्ध झाली आहे, तो आवाज ताराचा नसून सावलीचा आहे.
दुसरीकडे पारू मालिकेत मोठे वादळ आल्याचे पाहायला मिळाले. मोनिकाने ती प्रीतमच्या बाळाची आई होणार असल्याचे सांगितले होते. आता ही गोष्ट अहिल्यादेवीला समजली असून तिने ती सर्व कुटुंबीयांसमोर सांगितली आहे. त्यानंतर तिने प्रीतमला घराबाहेर काढले. त्यानंतर तो सोहमकडे म्हणजे सारंगच्या घरी गेल्याचे पाहायला मिळाले.
आपल्याला या माणसांशी कोणत्याही प्रकारचं नातं…
आता या मालिकेत विश्वंभरची एन्ट्री झाली आहे. विश्वंभरच्या मुलीचे व सोहमचे लग्न ठरले आहे. आता सावळ्याची जणू सावली व पारू या मालिकांच्या महासंगमचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, मेहेंदळे व किर्लोस्कर कुटुंब एकत्र आहे. तिथे विश्वंभरदेखील असल्याचे पाहायला मिळत आहे. तो अहिल्यादेवीचा हात धरतो. अहिल्यादेवी विश्वंभरच्या कानाखाली मारते.
अहिल्यादेवी तिलोत्तमाला विश्वंभरबद्दल माहिती देते. ती म्हणते, “हा विश्वंभर ठाकूर आहे. एका प्रोजेक्टसाठी याने मला लाच देऊ केली होती. त्याच्या भावाकडे बोट दाखवत म्हणते, हा आयटी ऑफिसर होता, अत्यंत भ्रष्ट आहे. आपल्याला या माणसांशी कोणत्याही प्रकारचं नातं जोडायचं नाहीये.
तिलोत्तमा म्हणते, हे लग्न मी होऊ देणार नाही. त्यावर विश्वंभर अहिल्यादेवीला म्हणतो, तू सापाच्या शेपटीवर पाय दिला आहेस, याचा असा बदला घेईन, आयुष्यभर लक्षात राहील.” हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “मुलीचं लग्न मोडल्याचा बदला कसा घेणार विश्वंभर?”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.