अभिनेत्री समृद्धी केळकर ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत समृद्धीने साकारलेली ‘किर्ती’ ही व्यक्तिरेखा बरीच गाजली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यावेळी समृद्धीने केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत होती. पण मालिका संपताच समृद्धीच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. समृद्धीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या मेहंदी फंक्शनच्या फोटोंची बरीच चर्चा आहे.

समृद्धी केळकरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्या हातांवर मेहंदी दिसत आहे. पण ही तिच्या लग्नाची मेहंदी नसून तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाची मेहंदी आहे. समृद्धीने हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘ताईचं लग्न’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोंमध्ये समृद्धी तिच्या बहिणीबरोबर पोझ देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी धम्माल कमेंट केल्या आहे.

आणखी वाचा- “मी घाबरले…”, ‘फुलाला सुंगध मातीचा’मधील किर्तीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

समृद्धी केळकरने आपल्या बहिणीच्या मेहंदी फंक्शनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, “नक्की, ताईचं लग्न आहे की तुझं…?” दुसऱ्या एका युजरने, “पाहिल्या पाहिल्या वाटलं तुझाच फोटो आहे, मला वाटलं सिरीयल संपल्यावर घरच्यांनी तुझं लग्न लाऊन दिलं.” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने कमेंटमध्ये, “तुमचं लग्न कधी?” असा प्रश्न केला आहे.

आणखी पाहा- फुलाला सुगंध मातीचा : फिटनेस, स्टॅमिना आणि दुखापत… असा होता कीर्तीचा IPS होण्याचा संघर्षमय प्रवास

View this post on Instagram

A post shared by samruddhi kelkar (@samruddhi.kelkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये समृद्धी आणि तिच्या बहिणीच्या चेहऱ्यात बरंच साम्य असल्याने चाहतेही गोंधळले आहेत असंच कमेंट्सवरून दिसून येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच शूटिंग संपल्यानंतर समृद्धी एक भावूक पोस्ट शेअर केली होती. “किर्ती मी तुला कधीच नाही विसरू शकणार. तू माझ्या हृदयाच्या खूप जवळ होतीस, आहेस आणि कायम राहशील.” असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.