Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या गुरुवारच्या ( ३ ऑक्टोबर ) भागात मिडवीक एलिमिनेशन झालं. डीजे क्रेटेक्सच्या पार्टीत ‘बिग बॉस’ने टॉप-६ सदस्यांची नाव जाहीर केली आणि वर्षा उसगांवकर घराबाहेर झाल्या. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता प्रभु वालाकलकर, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि सूरज चव्हाण हे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे टॉप-६ सदस्य असून यापैकी एक विजेता ठरणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचं ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ६ ऑक्टोबरला महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. पण त्याआधी घरात ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेतील नायिकांचा दंगा पाहायला मिळणार आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.

‘कलर्स मराठी’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये नवी मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’मधील नायिका बिग बॉसच्या घरात गेल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या शेटे, विदिशा म्हसकर, आकांक्षा गाडे, प्राजक्ता परब आणि शाश्वती पिंपळीकर या नायिका सदस्यांबरोबर धमाल-मस्ती करताना दिसत आहे.

हेही वाचा – “फक्त उत्सव नाही…”, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केल्यानंतर क्षितिज पटवर्धनसह मराठी कलाकारांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…

‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेतील नायिकांनी सदस्यांबरोबर एक खेळ खेळला आहे. पदार्थ ओळखण्याचा हा खेळ असून यातही सूरजला सुतरफेणी ओळखताना नाकीनऊ येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंकिता त्याला समजवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी असाच एक प्राणी ओळखण्याचा टास्क होता. ज्यामध्ये सूरजला पाण गेंडा ओळखता येत नव्हतं. तशीच काहीशी अवस्था सूरजची पुन्हा एकदा झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “आमच्या हास्यजत्रेवाले हलकट लोक…”, अभिनेता प्रसाद ओक असं का म्हणाला? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘कलर्स मराठी’ची नवी मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मैत्रीवर आधारित असलेल्या या मालिकेची सुरू होणाऱ्याची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झालेलं नाही. पण ‘पिंगा गं पोरी पिंगा’च्या जबरदस्त प्रोमोने प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवली आहे.