‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचं फॅन फॉलोइंगसुद्धा मोठं आहे. रोजच्या जीवनातील विविध घडामोडी प्राजक्ता चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्राजक्ताही चाहत्यांशी अनेक नवनवीन गोष्टी शेअर करत असते. आता तिने चाहत्यांना उत्तम व्यायामाची व्याख्या सांगितली आहे.

आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

प्राजक्ता तिच्या कामाबरोबरच तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. योगा, मेडिटेशन, जिम हे ती नियमित करताना दिसते. आता तिने असाच जिममध्ये व्यायाम करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “उत्तम व्यायामाची व्याख्या- जेव्हा तुम्हाला ती गोष्ट करायला आवडत नाही, पण तरीही ती पूर्ण करायला आवडते.”

हेही वाचा : Video: …अन् माईकसमोर बोलता बोलता प्राजक्ता गायकवाडला कोसळले रडू, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिथे चाहते तिच्याशी सहमत असल्याचं तिला सांगत आहेत. एकाने लिहिलं, “ते खरंच दिसून येतंय फोटोमध्ये की किती कंटाळा आलाय ते करताना.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “जिममधील तुझा पहिला दिवस वाटतोय.” तर आणखी एका नेटकरांनी लिहिलं, “ताई तू प्रत्येकालाच त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देतेस.” आता प्राजक्ता या पोस्टमुळे खूप चर्चेत आली आहे.