‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते समीर चौघुले सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. आता त्यांनी अभिनेता प्रसाद ओकच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

अभिनेता प्रसाद ओकचा आज वाढदिवस आहे. सध्या प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परीक्षक म्हणून काम पाहतो. समीर चौघुले यांनी प्रसादच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट करत प्रसाद ओकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- लग्नाआधीच्या ‘त्या’ ट्वीटमुळे स्वरा भास्कर झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले, “आधी भाऊ म्हटलं आणि…”

समीर चौघुलेंची इन्स्टाग्राम पोस्ट-

“Prasad Oak happy birthday… मित्रा पश्या… खूप खूप प्रेम…अतिशय अफलातून अभिनेता… आमच्या हास्यजत्रेत तो हास्यरसिक म्हणून जे काही बोलतो ते स्क्रिप्टेड वाटावं इतकं उत्स्फूर्त असतं… कमालीचा शब्दसंचय, अफाट वाचन, आणि अत्यंत टोकाची समयसूचकता असल्याशिवाय हे शक्य नाही… अभिनेता म्हणून तू काय आहेस? कोण आहेस? हे तू नुकतंच ‘धर्मवीर’ चित्रपटातून अख्या जगाला दाखवून दिलंयस..बहुतेक पुरुषोत्तम, INT आणि सवाई सोडल्यास उत्कृष्ठ अभिनेता या कॅटेगरीतली सगळी पारितोषिक तू गेल्या वर्षी जिंकलीस… ‘चंद्रमुखी’साठी दिग्दर्शक म्हणून तू घेतलेली मेहनत रसिकांनी ही डोक्यावर घेतली… मित्रा तू माझा “जवळचा मित्र” आहेस याचा खूप अभिमान वाटतो… तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही बाप्पा चरणी प्रार्थना… लव्ह यू मित्रा…”

समीर चौघुलेंच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच स्वतः प्रसाद ओकनेही कमेंट केली आहे. “थँक यू डार्लिंग” असं प्रसादने कमेंट करताना लिहिलं आहे. याशिवाय प्रसाद ओकची पत्नी मंजिरीनेही हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. समीर चौघुले यांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा- Video: समीर चौघुलेंची चिमुकली फॅन, ‘जिया जले…’चा भन्नाट व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान समीर चौघुले एक उत्कृष्ट अभिनेता आहेत. आपल्या अफलातून विनोदी अभिनय शैलीने ते प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. त्यांनी मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. समीर चौघुलेंचा चाहता वर्ग मोठा असून ते सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. समीर चौघुले ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात दिसले होते. तसेच प्रसाद ओक दिग्दर्शिक ‘चंद्रमुखी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.