सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मालिकांमध्ये देखील लग्नसोहळा पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता-सागरच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सईच्या प्रेमाखातर तयार झालेल्या मुक्ता-सागरचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतं आहे. साखरपुडा, मेहंदी समारंभ झाला असून सध्या संगीत सोहळा सुरू आहे. लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार असून दोघांचा लग्नातला लूक समोर आला आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात उर्वरित संगीत समारंभ पाहायला मिळाला. मुक्ताची आई तिच्यासंदर्भात भरभरून बोलताना दिसली. यावेळी सर्वजण भावुक झाले. पण त्यानंतर संगीत समारंभ कोळी कुटुंबाने हायजॅक केला. कोमल, स्वाती, लकीचा जबरदस्त डान्स झाला. मग सागरच्या आई-वडिलांचा म्हणजे इंद्रा-जयंत यांचा सरप्राईज डान्स पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी मुक्ताच्या आई-वडिलांसारखा पेहराव करून त्यांची हुबेहुब नक्कल करत डान्स केला. हे पाहून मुक्ताला भयंकर राग आला. पण नंतर सर्वकाही सुरळीत सुरू झालं. आजच्या भागात स्टार प्रवाह परिवारातील मंडळी डान्स करताना दिसणार आहेत. तसेच सई, मुक्ता-सागर यांचा देखील डान्स पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झळकणार आता चित्रपटात, फोटो शेअर करत म्हणाली…

संगीत, हळद समारंभानंतर मुक्ता-सागर लग्नबंधनात अडकणार असून सध्या त्यांच्या लग्नातील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नाच्या निमित्ताने मुक्ता-सागर अर्थात तेजश्री आणि राज विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधत आहेत. नुकताच त्यांनी ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तेजश्री आणि राजने एकमेकांच्या लग्नातील लूकवर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Video: ‘रात्रीस खेळ चाले’मधल्या माईची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नातील राजचा कोळी लूक पाहून तेजश्री म्हणाली, “तू कसला फिट दिसतोय यार. या पेहरावात परफेक्ट दिसतोय.” तर राज तेजश्रीला पाहून म्हणाला, “नऊवारीमध्ये मुक्ता फार सुंदर दिसतेय. पण नऊवारीमध्येच सीन करायला लागली तर चांगलं वाटेल.”