Priyadarshini Indalkar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रियदर्शिनी इंदलकर हे नाव घराघरांत लोकप्रिय झालं. गेल्या काही वर्षात आपल्या सहज-सुंदर अभिनयाने तिने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. याशिवाय प्रियदर्शिनीचा चाहतावर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोंवर चाहते कमेंट्सचा पाऊस पाडत असल्याचं पाहायला मिळतं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोची लोकप्रियता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. या कार्यक्रमाचे शो विविध देशांमध्ये आयोजित केले जातात. काही दिवसांपूर्वीच हास्यजत्रेचे सगळे कलाकार लंडन दौऱ्यावर गेले होते. याठिकाणी या सगळ्या हास्यवीरांनी मिळून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्याचं पाहायला मिळालं. तसेच मोकळ्या वेळेत या कलाकारांनी लंडनच्या विविध भागात सुंदर असं फोटोशूट केलं आहे.

हेही वाचा : अमृता देशमुखचा वहिनीसह जबरदस्त डान्स! कृतिकाने बॉलीवूडच्या बिग बजेट सिनेमात केलंय काम, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

प्रियदर्शिनी इंदलकरने परदेशात जाऊन चक्क साडी नेसून फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्रीचा हा लंडनमधला देसी अंदाज तिच्या सगळ्याच चाहत्यांना सुद्धा भावला आहे. कॉटनची साडी नेसून लंडन फिरताना अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होती.

प्रियदर्शिनी या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “लंडनमध्ये साडी नेसून फिरले… धावले, डान्स केला, उड्या मारल्या, नाचले, लोळले सर्वकाही केलं. आहा… मला किती आनंद झाला. मला काही अज्ञात लोकांनी या साडीबद्दल सुंदर अशा प्रतिक्रिया सुद्धा दिल्या, त्या ऐकून मला अधिक हुरुप मिळाला. मला साडी तशीही आवडते पण, लंडनमध्ये शायनिंग मारायला जास्त मजा आली!”

अभिनेत्रीने या फोटोंना सलील कुलकर्णींचं “नको करू सखी असा साजीरा शृंगार” हे गाणं लावलं आहे. तर, तिचे हे सुंदर फोटो अभिनेता ओंकार राऊतने काढले आहेत. प्रियदर्शिनीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी “वाह ग प्रिया”, “अतिशय सुंदर”, “फुलराणी”, “तुझ्यामुळे लंडन सुद्धा छान दिसतंय”, “ब्युटी विथ ब्रेन”, “मनमोहक” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “हिंदू धर्माचा रक्षक कोणी बनवलं?”, शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘त्या’ वक्तव्यासाठी मुकेश खन्नांची पात्रता काढली; म्हणाले, “सोनाक्षी…”

हेही वाचा : माधुरी दीक्षितने भाड्याने दिलं अंधेरीतील ऑफिस! दर महिन्याचं भाडं किती? आकडा वाचून थक्क व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियदर्शिनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय तिची प्रमुख भूमिका असलेला ‘रुखवत’ चित्रपट येत्या २७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये संतोष जुवेकर तिच्यासह मध्यवर्ती भूमिकेत आहे. तसेच ‘विषामृत’ या रंगभूमीवरील नाटकातून देखील प्रियदर्शिनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.