बिग बॉस हिंदीचं आता सोळावं पर्व सुरू आहे. दिवसेंदिवस या शोमधील रंगत वाढत चालली आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक त्यांच्या वागणुकीमुळे सध्या चांगलंच लक्ष वेधत आहेत. यात अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी ही ‘बिग बॉस १६’ मधील टॉप स्पर्धकांपैकी एक आहे. मध्यंतरी या शोमधील सर्व स्पर्धकांचं मानधन समोर आलं होतं. पण आता प्रियांकाने तिच्या मानधनात दुपटीने वाढ केल्याचं कळत आहे.

आधी ‘इमली’ फेम सुंबूल तौकीरला या या कार्यक्रमात सर्वाधिक फी मिळत होती. का आठवड्यासाठी तिला ११ लाख रुपये मानधन मिळायचं. तर त्याचवेळी प्रियांकाचं मानधन पाच लाख रुपये होतं. आता प्रियांकाच्या मानधनात चांगलीच वाढ झाली आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’ चित्रपट पाहा फक्त ५५ रुपयांत, जाणून घ्या कधी आणि कुठे मिळतील तिकिटं

हेही वाचा : सलमान खानची ‘बिग बॉस १६’च्या फिनालेमधून एग्झिट? ‘हा’ कलाकार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसात या शोमधील कलाकारांच्या मानधनात बरेच बदल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत सर्वाधिक फी आकारणारी सुंबूल गेल्या काही दिवसात कार्यक्रमात सक्रिय नव्हती. त्यामुळे तिची फी अर्धी करण्यात आली आहे. तर प्रियांका या शोमध्ये सक्रिय झाल्याने तिच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. आता तिला दर आठवड्याला दहा लाख रुपये मानधन मिळतं. त्यामुळे आता प्रियांका ही सुंबूलपेक्षा जास्त फी घेते.