लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत एकेकाळी सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता आहे. तो पाच दिवसांपासून घरी परतला नाही. मुंबईला जाण्यासाठी तो घरातून दिल्ली विमानतळावर गेला होता, पण तो मुंबईला पोहोचला नाही अन् घरीही परतला नाही, त्यानंतर त्याच्या वडिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रसिद्ध निर्माते जेडी मजीठिया यांनी गुरुचरण बेपत्ता असल्याबाबत माहिती दिली आहे.

जेडी मजीठिया म्हणाले, “मी एका मीटिंगमध्ये असताना गुरुचरण व माझी मैत्रीण भक्ती सोनीने मला फोन केला. तिने गुरुचरण २२ एप्रिलपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं. तो त्यादिवशी मुंबईला येणार होता, त्यासाठी तो घरातून निघाला, पण मुंबईला आला नाही. भक्ती त्याला आणायला मुंबई विमानतळावरही गेली होती, पण तो सापडला नाही. मग तिने एअरपोर्ट अथॉरिटीला विचारपूस केल्यावर कळालं की तो दिल्लीतून विमानात बसलाच नाही. पण विमानात बसण्याआधी बोर्डिंग प्रोसेस करत असल्याचा मेसेज त्याने भक्तीला पाठवला होता.” त्यांनी ‘ई-टाइम्स’ला ही माहिती दिली आहे.

मुंबईला जाण्यासाठी निघाला, पण पोहोचलाच नाही; ‘तारक मेहता…’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता

जेडी मजीठिया पुढे म्हणाले, “गुरुचरणचे वडील त्याला शोधत होते, नंतर त्यांनी तो बेपत्ता असल्याची जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचे आई-वडील खूप वृद्ध आहेत आणि त्यांची प्रकृती बरी राहत नाही. मला भक्तीने गुरुचरणबद्दल सांगितल्यावर मी मेसेज करून सर्वांना त्याच्याबद्दल सांगितलं. मी तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशींनाही फोन करून कळवलं.”

“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”

गुरुचरण सिंगच्या मानसिक आरोग्याबाबत विचारलं असता जेडी म्हणाले, “तो अगदी ठणठणीत आहे. मी दिलीप जोशींनी बोललो तेव्हा त्यांनीही सांगितलं की तो खूप चांगला आहे. गुरुचरण बेपत्ता आहे हे जास्तीत जास्त लोकांना कळावं आणि त्याने सुखरुप घरी परतावं इतकीच माझी इच्छा आहे.”

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुचरण सिंग शेवटचा टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसला होता. पण त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची कारणं देत त्याने हा टीव्ही शो सोडला होता.