प्रसिद्ध अभिनेता राहुल महाजन हा पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. राहुल महाजन लवकरच त्याची तिसरी पत्नी नताल्या इलिनापासून घटस्फोट घेणार आहे. राहुल आणि नताल्या या दोघांनी वर्षभरापूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मात्र अद्याप त्यांच्या घटस्फोटाला कायदेशीररित्या मान्यता देण्यात आलेली नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी आहे. त्या दोघांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली. नताल्या आणि राहुल या दोघांमध्ये १८ वर्षाचे अंतर आहे. राहुल आणि नताल्या स्मार्ट जोडी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता.
आणखी वाचा : राहुल महाजनचं तिसरं लग्नही मोडणार? पत्नीला घटस्फोट देण्याच्या चर्चांवर म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”

यावेळी राहुलने नताल्याशी माझी पहिली भेट ही एका रेस्तराँमध्ये झाल्याचे सांगितले होते. त्यावेळी नताल्याला तिच्या आईने राहुलबरोबर लग्न करावे, असे वाटत होते. त्यावेळी राहुलला लग्न करायचे होते. तो वधूच्या शोधात होता. मी त्यावेळी माझ्या आईबरोबर त्याचे सेटींग करता येईल का? याचा प्रयत्न करत होते, असे नताल्या म्हणाली होती.

नताल्याची आई दिसायला खूपच सुंदर आणि तरुण आहे. त्या माझ्यापेक्षा फक्त ४ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे नताल्याला असं वाटतं होतं की मी तिच्या आईशी लग्न करावे. कारण आमच्यात वयाचे अंतर कमी होते. पण मला पहिल्याच भेटीत नताल्या आवडली होती आणि त्यामुळे मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे राहुलने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : Video : “परदेशात बसून धमक्या…” दाऊद इब्राहिमबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर समीर वानखेडेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले “खूप लहान गुन्हेगार…”

दरम्यान नताल्याशी लग्न करण्यापूर्वी राहुलची दोन लग्न आणि घटस्फोट झाले होते. राहुलने २००६ मध्ये श्वेता सिंहबरोबर लग्नबंधनात अडकला होता. श्वेता ही राहुलची खूप चांगली मैत्रीण होती. श्वेताने राहुलवर मारहाणीचा आरोप करत २००७ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. राहुल आणि श्वेता २००८ मध्ये वेगळे झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वेताबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर राहुलने २०१० मध्ये प्रसिद्ध मॉडेल डिंपी गांगुलीशी लग्न केले. डिंपी आणि राहुलची भेट एका स्वयंवर शोमध्ये झाली होती. त्यानंतर डिंपी आणि राहुलचे नातेही जास्त काळ टिकले नाही. तिने त्याच्यावर मारहाणीचा आरोप करत २०१५ मध्ये घटस्फोट घेतला.