छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेला ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून शोमध्ये हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना तो बोलतं करणार आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. या भागात अवधूतसह राज ठाकरे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच स्वतःला आणि इतरांना खुपणाऱ्या गोष्टींवरही राज यांनी भाष्य केलं. शिंदे सरकार निवडून आलं तेव्हा लोकशाही परत आली असं काही लोकांचं म्हणणं होतं, तर आपल्या पक्षात घराणेशाही ऐवजी लोकशाही टिकून राहावी यासाठी राज ठाकरे नेमकं काय करतात? असा प्रश्न अवधूत गुप्ते यांनी विचारला. राज ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे याचं उत्तर दिलं.

आणखी वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करण्याची राज ठाकरेंची इच्छा, म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला…”

राज ठाकरे म्हणाले, “मला असं वाटतं की लोकशाही किंवा घराणेशाहीपेक्षा एखादी परिस्थिती नीट हाताळली जाणं, लोकांचे प्रश्न सुटणं हे जास्त महत्त्वाचं आहे. लोकशाहीतून एखादी व्यक्ती निवडून आली अन् जर ती काम करत नसेल किंवा घराणेशाहीतून एखादी व्यक्ती निवडून आली जी काम करत असेल तर त्यावर तुम्ही काय म्हणणार? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज आले, याला तुम्ही घराणेशाही म्हणणार का? आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने देश चालवला ती गोष्ट वाखाणण्याजोगी आहे.”

भाजपा-नरेंद्र मोदी, भाजपा-अटलबिहारी वाजपेयी यांची उदहरण देत पुढे राज ठाकरे म्हणाले, “शेवटी लोक हे व्यक्तीकडे बघूनच मतदान करतात. सत्तेवर येणारा माणूस ती गोष्ट हाताळतोय कशी यावार सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. लोकशाहीतही आपण अपयश पाहिलेलं आहे. या शाह्या महत्वाच्या नाहीत, व्यक्ती महत्त्वाची आहे.” यानंतर नुकतंच निवडून आलेल्या शिंदेशाहीच्या कामाबद्दल प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले, “अजून त्यांना सिद्ध करायचं आहे स्वतःला, ते आत्ताच आले आहेत. प्रश्न असाय की राज्याचे जे सर्वेसर्वा होतेत्यांच्या नाकाखालून ४० लोक निघून जातात कसे? इतकी लोक निघून गेले, ते का नाराज आहेत ही गोष्ट त्यांना समजली नाही का? म्हणूनच मी मगाशी म्हंटलं तसं लोकशाही किंवा घराणेशाही महत्त्वाची नसून ती व्यक्ती कोण आहे हे जास्त महत्त्वाचं असतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित होणार असून याचे भाग तुम्ही ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.