अभिनेत्री राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही ना काही अतरंगीपणा करून ती सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेत असतो. काही दिवसांपूर्वी मी राखीने एका पायलटवर पैसे उडवले होते. आता तिने तिच्या त्या कृतीमागचं स्पष्टीकरण दिलं आहे.

चार-पाच दिवसांपूर्वी राखी सावंतचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये राखी विमानतळाच्या पार्किंग एरियात एका वैमानिकावर पैशांच्या नोटा उडवताना दिसली. तिने केलेली ही कृती पाहून नेटकरी नाराज झाले आणि तिला सर्वत्र ट्रोल करण्यात आलं. आता तिने हे का केलं याचं कारण तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : Video: सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्यांचे मोबाईल घेऊन पळाली राखी सावंत, नंतर असं काही केलं की…

राखी म्हणाली, “मी त्या वैमानिकावर पैसे उडवले कारण त्याने मला यमराज्याच्या दारातून परत आणलं आहे. नाहीतर मी विमानत असताना यमराजाने मला त्याच्याकडे बोलवून घेण्याची पूर्ण तयारी केली होती. वरती हवामान खूप खराब होतं आणि त्यामुळे विमान खूपच हलत होतं. पण त्या वैमानिकाने अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थित आम्हा सर्वांना इच्छित स्थळी पोहोचवलं. त्यामुळे त्याच्यावर मी पैसे उडवले आणि मी माझा आनंद अशाप्रकारेच व्यक्त करते.”

हेही वाचा : Video: “हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा…”; राखी सावंतने केलेला लुंगी डान्स पाहून नेटकरी हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखीचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. तर तिच्या या विधानावर आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा तिच्यावर टीका करू लागले आहेत.