ड्रामा क्वीन राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी तुरुंगातून बाहेर आला आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये राखी सावंतने अचानक तिच्या लग्नाची बातमी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी पती आदिल खान दुर्रानीवर घरगुती हिंसाचार व फसवणुकीचे आरोप केले होते. पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये आदिलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता तब्बल सहा महिन्यांनंतर आदिल खान तुरुंगातून बाहेर आला आहे.

“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…

तुरुंगातून बाहेर आलेला आदिल आज मुंबईत पापाराझींना दिसला. यावेळी त्यांच्याशी बोलताना आदिलने राखी सावंतबद्दल वक्तव्य केलं. तो म्हणाला, “माझ्यासोबत जे घडलं ते खूप चुकीचं होतं. मी काही दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगेन. आता कोणीही येऊन मला तुरुंगात पाठवून प्रसिद्धी मिळवू शकत नाही.”

कोणी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सुबोध भावे म्हणाला…

आदिल खान पुढे म्हणाला, “हे काय, का आणि कोणत्या कारणामुळे घडले ते सर्व मी तुम्हाला सांगेन. मी माझी बाजू मांडेन. मला कशा पद्धतीने अडकवण्यात आलं, तेही सांगेन. यामध्ये राखीसोबत इतर काही लोकही सामील होते. माझ्यासोबत काय घडलं आणि मी कुणालाकडून कोट्यवधी रुपये घेतले आहेत की लोकांनी माझ्याकडून घेतले, तेही समोर येईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखी सावंतने ६ फेब्रुवारी २०२३ रोजी आदिलविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. फसवणूक, घरगुती हिंसाचार, दागिन्यांची चोरी असे अनेक आरोप तिने आदिलवर केले होते. आदिलनेच लग्न लपवण्यास भाग पाडले होते, असंही तिने म्हटलं होतं. त्यानंतर म्हैसूरमधील एका इराणी विद्यार्थिनीनेही आदिलवर बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. आदिल तुरुंगात गेल्यानंतर काही दिवसांनी राखीने तिचा घटस्फोट साजरा केला होता. पण तिचा घटस्फोट अधिकृतरित्या झाला आहे की नाही, याबाबत माहिती समोर आली नाही.