ड्रामा क्वीन राखी सावंत रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. राखीचा पती आदिल खान दुर्रानी सध्या तुरुंगात आहे. राखीनेच त्याच्याविरोधात मारहाण व फसवणुकीचे आरोप केले होते. त्याशिवाय एका इराणी मुलीने आदिलवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्यानंतर त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राखी म्हणाली होती.

मराठी चित्रपट ‘TDM’ला शो मिळेना, कलाकारांना थिएटरमध्ये कोसळलं रडू; दिग्दर्शक म्हणाले, “असा भेदभाव…”

राखी सावंतने नुकताच पती आदिलने तुरुंगातून फोन केल्याचा खुलासा केला आहे. यावेळी आदिलने आपली माफीही मागितल्याचे त्याने म्हटले आहे. पण यावेळी तिने आदिलला माफ केले तर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो, असं तिचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत राखी म्हणाली, “आज आदिलचा तुरुंगातून फोन आला होता, मी त्याला म्हटलं की तुरुंगातून बाहेर ये व मला घटस्फोट दे. त्यावर त्याने माफी मागितली व घटस्फोट देणार नाही, असंही म्हणाला. मी म्हटलं की तू माझं आयुष्य उध्वस्त केलंस. त्यामुळे मी तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवू शकत नाही. मी त्याला घाबरले आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी पुढे म्हणाली, “माफी मागण्याचा प्रश्न नाही. कोर्टातील न्यायाधीशांनाही मी म्हणेन की माझ्या जागी त्यांची बहीण आहे, असं समजून त्यांनी विचार करावा. यावेळी जर मी त्याला माफ केले तर माझ्या जीवाला धोका आहे. एकच आयुष्य आहे, त्यामुळे मी स्वतःच माझा जीव कसा देऊ,” असंही तिने म्हटलं. दरम्यान, आजकाल राखी सावंत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आदिलबरोबरचे जुने व्हिडीओ शेअर करत आहे. पण, आदिलला माफ न करण्याच्या निर्णयावर ती अजुनही ठाम आहे.