Ram Kapoor addresses rumoured fallout with Ekta Kapoor : एकता कपूरने दिव्यांका त्रिपाठी, मौनी रॉय, तेजस्वी प्रकाश व अनिता हसनंदानी यांसारख्या अभिनेत्रींना त्यांचे सर्वांत मोठे शो दिले आणि अग्रगण्य टीव्ही अभिनेत्री बनवले. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर प्रत्येक घरात ओळख मिळविणाऱ्या कलाकारांमध्ये राम कपूरचे नावदेखील समाविष्ट आहे.

राम कपूरने एकता कपूरबरोबर अनेक शोमध्ये काम केले आहे. परंतु, काही दिवसांपासून असे वृत्त येत होते की, ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतील इंटिमेट सीनवर त्याने कमेंट केल्याने दोघांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या आहेत.

आता रामने या वृत्तांवर आपले मत मांडले आहे. राम म्हणतो की, एकता कपूर काहीही बोलू शकते. राम कपूर याचे हे विधान बालाजी टेलिफिल्म्सच्या प्रमुख एकता कपूरला आवडले नाही. त्याचे नाव न घेता एकताने त्याला ‘अनप्रोफेशनल’ म्हटले.

राम काय म्हणाला?

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत राम म्हणाला, “ती काहीही बोलू शकते; पण मी काहीही बोलणार नाही. कारण- आज माझ्याकडे जे आहे, ते तिनेच मला दिले आहे. जेव्हा कोणी माझ्यावर विश्वास दाखवला नाही तेव्हा तिने माझ्यावर विश्वास दाखवला आणि यासाठी मी नेहमीच तिचा आभारी राहीन. तिला माझ्याबद्दल काहीही बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

या सगळ्यादरम्यान, रामच्या पत्नीने एक क्रिप्टिक पोस्ट केली होती आणि त्याला एक मजेदार भांडण म्हटले होते. त्यावर रामने त्याच मुलाखतीत म्हटले होते, “माझ्या बायकोला माहीत आहे की, मी काय विचार करतो. हे सर्व फक्त मजा करण्यासाठी होते. तुम्ही कोणासाठी काय केले आहे ते तुम्ही कधीही विसरू शकत नाही.”

एकता कपूर आणि राम कपूर यांच्यातील वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा राम कपूरने त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की, सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘बडे अच्छे लगते हैं’ या शोमध्ये सहकलाकार साक्षी तंवरबरोबर इंटिमेट सीन्स करण्यास तो अस्वस्थ होता आणि नंतर त्याला अनेक परिस्थितींमधून जावे लागले.

एकता कपूरला रामचे ते विधान आवडले नाही आणि तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कोणाचेही नाव न घेता लिहिले, ‘माझ्या शोबद्दल मुलाखती देणाऱ्या अनप्रोफेशनल कलाकारांनी गप्प राहावे. खोट्या बातम्या पसरवू नका.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.