Ram Mandir Inauguration: अयोध्येत राम मंदिराचे भव्य उद्धाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्याची तयार सुरू आहे. या प्राण प्रतिष्ठा समारोहमध्ये अनेक कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. पण लोकप्रिय शो ‘रामायण’ मध्ये लक्ष्मण ही भूमिका साकारणारे सुनील लहरी यांना निमंत्रण मिळालेलं नाही. रामाची भूमिका करणारे अरुण गोविल व सितेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं आहे. यानंतर ‘लक्ष्मण’ सुनील लहरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील लाहिरी म्हणाले, “प्रत्येक वेळी तुम्हाला बोलावलंच पाहिजे असं नाही. पण मला बोलावलं असतं तर मी नक्कीच गेलो असतो. मला निमंत्रित केलं असतं तर बरं झालं असतं. मलाही इतिहासाचा भाग बनण्याची संधी मिळाली असती, पण हरकत नाही. चिंतित होण्याचे काहीही कारण नाही.”

मराठमोळ्या बॉलीवूड अभिनेत्रीचा १४ वर्षांचा संसार मोडला? ९ वर्षांची आहे लेक; घटस्फोटाबाबत म्हणाली, “मला माझी…”

‘रामायण’च्या निर्मात्यांनाही निमंत्रित करण्यात आलेलं नाही, याबद्दल सुनील लहरी यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. “कदाचित त्यांना वाटत असेल की लक्ष्मणाचे पात्र तितकेसे महत्त्वाचे नाही किंवा मी त्यांना आवडत नसेन. मी प्रेम सागरसोबत होतो, पण त्यांनाही बोलावण्यात आलेलं नाही. त्यांनी ‘रामायण’च्या निर्मात्यांपैकी कोणालाही निमंत्रित केलेलं नाही हे मला विचित्र वाटतंय,” असं सुनील लहरी म्हणाले.

‘या’ अभिनेत्रीने करिअरमध्ये केले फक्त ७ सिनेमे; सुपरस्टारशी लग्न, मुलीचा जन्म अन् ९ वर्षांनी घेतलेला जगाचा निरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, “कुणाला निमंत्रित करायचे आणि कुणाला नाही, हा पूर्णपणे समितीचा निर्णय आहे. मी ऐकलंय की ७००० पाहुणे आणि ३००० व्हीआयपी लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी रामायण कार्यक्रमाशी संबंधित असलेल्यांना, विशेषत: मुख्य कलाकार आणि निर्मात्यांनाही निमंत्रित करायला हवं होतं.” आपल्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण असतं तर आपण नक्कीच गेलो असतो, असं त्यांनी नमूद केलं.