पहिल्या टीझरपासून वादात अडकलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर शुक्रवारी १६ जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटातील हनुमानाचे संवाद ऐकून सोशल मीडियावर नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अनेक जण ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तुलना रामानंद सागर यांच्या ‘रामायणा’शी करत आहेत. अशातच ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मण म्हणजेच सुनील लहरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘आदिपुरुष’वरील वादादरम्यान कंगना रणौतची पोस्ट चर्चेत, फोटो शेअर करत म्हणाली, “रामाचे नाव…”

सुनील लहरी यांनी ट्विटरवर आदिपुरुष चित्रपटाचे कोलाज पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटातील हनुमान आणि रावणाचे काही संवाद लिहिलेले आहेत. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं “‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायण समोर ठेवून बनवण्यात आला आहे, असं म्हटलं जात आहे, जर ते खरं असेल तर अशी भाषा वापरणे अत्यंत लाजिरवाणे आहे.”

सुनील लहरी यांच्या ट्वीटवर नेटकरी कमेंट्स करत आहेत. त्यांनी सुनील यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं असून आदिपुरुषच्या निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
sunil lahri
सुनील लहरी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतने केलं आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. चित्रपटाला विरोध होत असला तरी त्याने पहिल्याच दिवशी जगभरात १४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला वीकेंडला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.