छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेने अल्पावधीतच कलाविश्वात स्वत:ची ओळक निर्माण केली. रेश्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. रेश्मा अनेक फोटो व व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या रेश्माने केलेल्या पोस्टमुळे ती चर्चेत आहे.

रेश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मुंडावळ्या बांधलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रेश्माने या फोटोला “जेव्हा घरातून लव्ह मॅरेजला परमिशन मिळते, तेव्हा नवरी सासरी जाताना”, असं कॅप्शन दिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा>> डीप नेक ड्रेसमध्ये फोटोशूट केल्यामुळे प्रार्थना बेहरे ट्रोल, नेटकरी म्हणाले “म्हातारी…”

हेही वाचा>>‘बिग बॉस मराठी’ फेम विकास सावंत करतोय ऑलिम्पिकची तयारी, म्हणाला “माझी ताकद…”

रेश्मा सध्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची भूमिका साकारत आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर असून दीपा व कार्तिकचा विवाहसोहळा मालिकेत पाहायला मिळत आहे. त्याच दरम्यानचा हा मालिकेतील फोटो रेश्माने पोस्ट केला आहे.

हेही वाचा>>मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरची पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली “आता शेंगदाणे विकू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१४ साली ‘लगोरी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या रेश्माने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. तिने अनेक मालिकांसह चित्रपटांतही काम केलं आहे. ‘लालबागची राणी’ या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.