Gharoghari Matichya Chuli Fame Reshma Shinde Dance Video : छोट्या पडद्याची लाडकी सून म्हणून रेश्मा शिंदेला घराघरांत ओळखलं जातं. ‘रंग माझा वेगळा’ असो किंवा सध्या सुरू असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका असो…रेश्मा नेहमीच मालिकांमध्ये आदर्श सुनेची भूमिका साकारताना दिसते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रेश्मा सोशल मीडियावर देखील कायम असते. तिचे सेटवरचे भन्नाट डान्स व्हिडीओ चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

रेश्माने नुकताच संजू राठोडच्या व्हायरल ‘शेकी’ गाण्यावर तिच्या ऑनस्क्रीन लेकीसह जबरदस्त डान्स केला आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा शिंदे ‘जानकी’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत जानकीच्या लेकीची भूमिका बालकलाकार आरोहीने साकारली आहे. या मायलेकींचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग देखील तेवढंच सुंदर आहे.

रेश्माने तिच्या ऑनस्क्रीन लेकीबरोबर ‘एक नंबर तुझी कंबर’ म्हणत ठेका धरल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रेश्मा लिहिते, “बेस्ट डान्स पार्टनर आई-मुलीचं प्रेम…जानकी आणि ओवीची जोडी, तुम्हाला तुमच्या आई किंवा मुलीबरोबर थिरकायला आवडेल का?”

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. जानकी आणि ओवीचा हा ऑफस्क्रीन डान्स पाहून ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत खलनायिका ऐश्वर्याची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक्षाने रेश्माच्या व्हिडीओवर “क्यूट” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा या दोघींच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“आई अन् लेकीची बेस्ट ऑनस्क्रीन जोडी”, “अगं किती गोड व्हिडीओ आहे हा”, “किती सुंदर डान्स केलाय”, “जानकी ओवी खूप सुंदर”, “लव्हली जोडी”, “आरोही किती गोड आणि उत्तम करत आहे”, “लय भारी” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडीओला जवळपास ३३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. रेश्माच्या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सायंकाळी साडेसात वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.