‘सारेगमप : लिटील चॅम्प्स’चा पहिला सीजन आजतागायत प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यातले स्पर्धक आजही आपापल्या गायकीने सगळ्यांच्या मनावर राज्य करतायत. त्यातल्याच दोन स्पर्धकांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते लग्नबंधनात अडकले. तीन वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी २३ जानेवारी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली.

रोहित आणि जुईलीने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या यूट्यूब चॅनेलला भेट दिली. या मुलाखतीत रोहित आणि जुईलीची मैत्री कशी झाली? त्याबद्दल दोघांनी एक किस्सा सांगितला आहे. रोहित म्हणाला, “मला मुली म्हणजे एलियन प्रकार वाटायचा. कारण- मी मुलांच्या शाळेत शिकलेलो. आमच्या शाळेत मुलं-मुलं वेगळी आणि मुली-मुली वेगळ्या. तर हाय, हॅलो, बाय हे कसं होतं माहीत नव्हतं. तर मला ना फक्त एकच माहीत होतं की, खोड्या काढायच्या म्हणजे आपल्याकडे लोक लक्ष देतील. तर सारेगमपच्या वेळेस मी तालीमला धावत धावत जायचो आणि ही दोन वेण्या वगैरे बांधायची. मग मी एक वेणी अशी सटकन खाली खेचून पळत सुटायचो.”

त्यालाच जोडून जुईली म्हणाली, “हा मागून कुठून तरी जाताना एक वेणी खेचायचा, दुसरी वेणी खेचायचा आणि एके दिवशी मी रडायलाच लागले. त्या वेळेस आमची जास्त ओळख नव्हती. पण, मग मी आईला जाऊन याचं नाव सांगितलं की, हा असा मुलगा आहे आणि हा मला खूप जास्त त्रास देतोय. आणि मग आईनं त्याला हॉटेलवर बोलावलं. आम्ही तेव्हा ग्रुमिंग सेशनसाठी हॉटेलमध्ये होतो. आईनं रोहितला रूममध्ये बोलावलं आणि त्याला खूप झापलं. डोळे मोठे करून ती बोलत होती की, असं नाही करायचं. मग तो म्हणाला की, हो असं नाही करत; पण मला खेळायचंय हिच्याशी म्हणून मी असं करतोय.”

हेही वाचा… १० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा, म्हणाली, “माझ्या आयुष्यातल्या पहिल्या…”

रोहित पुढे म्हणाला, “मी कोणालाच ओळखत नाही इकडे आणि ही माझ्या एपिसोडला आहे ना. त्यामुळे मला हिच्याशी हाय, हॅलो किंवा आपण खेळू या का?, असं सगळं बोलायचंय, असं मी तिच्या आईला सांगितलं होतं”

हेही वाचा… संस्कृती बालगुडे आहे ‘या’ अभिनेत्याची फॅन; दोघंही लवकरच झळकणार एका चित्रपटात, अभिनेत्री म्हणाली, “…आणि शेवटी ते झालंय”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सारेगमप : लिटील चॅम्प्स’च्या पहिल्या सीजनमध्ये आर्या आंबेकर, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड हे स्पर्धक टॉप-५ च्या यादीत होते. या शोची विजेती कार्तिकी गायकवाड ठरली होती. या शोमधील मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनीदेखील २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्नगाठ बांधली.