रुबिना दिलैक देणार गुड न्यूज ? खुलासा करत म्हणाली, "मी आणि अभिनव आता..." | Rubina dilaik breaks her silence on her pregnancy rumours | Loksatta

रुबिना दिलैक देणार गुड न्यूज ? खुलासा करत म्हणाली, “मी आणि अभिनव आता…”

रुबिनाने २०१८ साली अभिनव शुक्लाबरोबर लग्नगाठ बांधली.

रुबिना दिलैक देणार गुड न्यूज ? खुलासा करत म्हणाली, “मी आणि अभिनव आता…”

अभिनेत्री रुबिना दिलैक ही नेहमी तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकतीच ती छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील तिच्या प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांना वेड लावलं. आता हा कार्यक्रम संपल्यानंतर एका वेगळ्याच कारणामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आहे. रुबिना गरोदर आहे अशा चर्चा गेले काही दिवस रंगत आहेत. आता यावर तिने मौन सोडलं आहे.

रुबिनाने २०१८ साली अभिनव शुक्लाबरोबर लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. हे कपल कधी गुड न्यूज देणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. रुबिना आणि अभिनव नुकतेच एका दवाखान्याबाहेर स्पॉट झाले. त्यांना दवाखान्याबाहेर पाहून त्यांचे चाहते रुबिना गरोदर आहे आणि तिचा चेकअप करण्यासाठी आली आहे असं बोलू लागले. ही बातमी इतक्या वेगाने पसरली की अखेर रुबिनालाच याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

आणखी वाचा : “दाक्षिणात्य चित्रपटांची खिल्ली उडवणारेच आज…” राणा दग्गुबातीचे परखड भाष्य

रुबिनाने नुकतंच एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये तिने लिहिलं, “गरोदरपणाबद्दल लोकांच्या मनात चुकीचा समाज आहे. अभिनव, यापुढे आपण कोणत्याही बिल्डिंगमध्ये जात असू तर तिथे जाण्याआधी त्या बिल्डिंगमध्ये दवाखाना नाहीये ना हे आधी तपासून घेतलं पाहिजे. आपण तिथे एखाद्या मीटिंगसाठी जरी जात असलो तरी ही खबरदारी आपल्याला घ्यायला हवी.”

हेही वाचा : डान्ससाठी काहीपण! ‘झलक दिखला जा’साठी रुबिना दिलैकने परिधान केला ‘इतक्या’ किलोचा घागरा

तिच्या या ट्वीटवर तिच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुबिनाच्या या ट्वीटमुळे ती गरोदर नाही हे आता स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:34 IST
Next Story
शैलेश लोढा ‘तारक मेहता…’ मालिकेत परतणार? दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत, म्हणाले…