छोट्या पडद्यावरील एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘झलक दिखला जा.’ या कार्यक्रमाच्या या पर्वात नावाजलेले कलाकात स्पर्धक म्हणून सहभागी होऊन त्यांचे नृत्य कौशल्य दाखवत आहेत. अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील या बहुचर्चित डान्स शोमध्ये तिने सहभाग घेतला. एकापेक्षा एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत ती प्रेक्षकांप्रमाणेच या शोच्या परीक्षकांचं मन जिंकत आहे. परंतु एका डान्सची रिहर्सल करताना तिला दुखापत झाली आहे.

आणखी वाचा : करण कुंद्राबरोबर ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या १२ वर्षीय रिवा अरोराचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, म्हणाली…

रुबीनाने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत रुबिना डान्सची रिहर्सल करत असताना तिला कशी दुखापत झाली गे दिसत आहे. कोरिओग्राफर सनम जोहर आणि रुबिना डान्सचा सराव करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यात सनमला रुबिनाच्या उंचीच्या वरून उडी मारायची असताना त्याचा तोल गेला आणि त्याचा धक्का रुबिनाच्या चेहऱ्याला लागल्याने ती खाली पडल्याचे दिसत आहे. या अपघातात तिच्या खांद्याला दुखापत झाली आणि, असे तिने व्हिडीओबरोबर पोस्ट केलेल्या फोटोतून समोर आले आहे.

रुबिनाने तिच्या दुखापतीची माहिती दिल्यावर सोशल मीडियावर सर्वजण तिची विचारपुस करू लागले आहे. रुबिना लवकर बरी होण्यासाठी रुबिनाच्या चाहत्यांप्रमाणेच सृष्टी रोडे, अनेरी वजानी, जन कुमार सानू, निया शर्मा यांसारख्या कलाकारांनीही तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा : आयुष्यात असं काहीतरी…, माधुरी दीक्षितकडून मिळालेल्या अमूल्य पोचपावतीनंतर अमृताची भावनिक पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनम जोहर या शोमध्ये रुबिनाचा कोरिओग्राफर आहे. सनम आणि रुबिनाच्या डान्समधील ट्युनिंग प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आणि. त्यामुळे तिने लवकरात लवकर बरे व्हावे आणि या शोमध्ये धमाकेदार एंन्ट्री करावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत.