हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रुबिना दिलैक. ‘बिग बॉस १५’ आणि ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमांमधून काही महिन्यांपूर्वीपर्यंत ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. त्यामुळे तिचा चाहता वर्ग ही प्रचंड वाढला आहे. तर आता रुबिना तिच्या कामातून थोडा ब्रेक घेत गावाकडच्या जीवनशैलीचा आनंद घेताना दिसली.

रुबिना तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चांगलीच चर्चेत असते. ती सोशल मीडिया वरून विविध पोस्ट करत तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. तर आता नुकतेच तिने काही तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले. याचं कारण म्हणजे आतापर्यंत कधीही न पाहिलेला रुबिनाचा अंदाज या व्हिडिओमधून समोर आला आहे.

आणखी वाचा : रुबिना दिलैक देणार गुड न्यूज ? खुलासा करत म्हणाली, “मी आणि अभिनव आता…”

रुबिना दिलैकने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. यात रुबिना हिमाचल प्रदेशच्या पारंपारिक पोशाखात दिसत असून तिने भांगेत सिंदूर भरलं आणि कपाळावर टिकलीही लावली आहे. तसंच चुलीसमोर बसून काहीतरी खाताना दिसत आहे. त्याचबरोबर यावेळी ती चुलीवर अन्न शिजवताना आणि चुलीखालची आग वाढवण्यासाठी फुंकणीने चुलीत फुंकर मारतानाही ती दिसत आहे.

हेही वाचा : “आता पुरे…” सलमान खानच्या गायकीने नेटकरी हैराण, नव्या गाण्यामुळे भाईजान ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुबिना दिलैकचा हा साधेपणा नेटकऱ्यांना खूप भावला असून याबद्दल तिचा सर्वजण कौतुक करू लागले आहेत. त्यामुळे या व्हिडिओमुळे रुबिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.