अभिनेत्री रुपाली भोसले ‘बिग बॉस मराठी’नंतर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे चांगली प्रसिद्धी झोतात आली आहे. या मालिकेतील तिने साकारलेली संजना आता घराघरात पोहोचली आहे. तिने साकारलेल्या संजनावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. नुकताच २९ डिसेंबरला संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेचा वाढदिवस झाला. पण या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे.

डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून अभिनेत्री रुपाली भोसलेचे चाहते तिचा वाढदिवस साजरा करत आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. नुकताच तिचा वाढदिवस ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर साजरा करण्यात आला. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार मंडळी अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अलीने पलक तिवारीसह नवीन वर्ष केलं साजरं, व्हिडीओ व्हायरल

रुपाली भोसलेने सेटवरील हा व्हिडीओ शेअर लिहिल आहे, “धन्यवाद मित्रांनो…वाढदिवस संपला? तर नाही…’आई कुठे काय करते’च्या सेटवर मी माझा चौथा वाढदिवस साजरा केला. याचा अर्थ हा चार वर्षांचा प्रवास आहे. धन्यवाद संजना, या सुंदर प्रवासासाठी. माझ्या हृदयाच्या खूप जवळचा हा प्रवास आहे. मला संजना भूमिका साकारायला खूप आवडतं आणि मला यातून खूप आनंद मिळतो. संजनामध्ये मी आता मानसिक, शारीरिक, आत्म्याने गुंतून गेली आहे. मी माझा प्रत्येक सीन पुसून टाकण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा मी नवीन सीन करते तेव्हा नवीन दृष्टीकोनातून तो करण्याचा प्रयत्न करते. मी नेहमी माझं सर्वोत्तम देते. आय लव्ह यू संजना”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Video: “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं…”, म्हणत प्रसाद ओकने नवीन वर्षी दाखवली नव्या घराची झलक

दरम्यान, रुपालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘आई कुठे काय करते’ मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने हिंदी मालिकाविश्वात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे.