काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेले असते, त्यामुळे अशा मालिका संपताना प्रेक्षकांना वाईट वाटते. सध्या ‘आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Krte) ही मालिका संपणार आहे, त्यामुळे ही मालिका मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेतील कलाकार त्यांच्या भावना विविध माध्यमातून मांडत आहेत. आता ‘आई कुठे काय करते’मध्ये खलनायिकेची म्हणजेच संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसले(Rupali Bhosle)ने शेअर केलेला व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ

रुपाली भोसलेने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एक ट्रक दिसत असून काही माणसे त्यामध्ये खुर्च्या भरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर रुपालीने समृद्धी घर रिकामं होतंय, असे लिहित त्यापुढे भावुक इमोजी शेअर केल्या आहेत.

स्टार प्रवाहने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये रुपालीने ‘आई कुठे काय करते’ मालिकेने या घराच्या नावासारखंच तिला समृद्ध केल्याचे म्हटले होते. या मालिकेत अभिनेत्रीने संजनाची भूमिका साकारली आहे. सुरुवातीला अनिरुद्धची गर्लफ्रेंड आणि नंतर त्याची बायको असा तिचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळाला आहे. स्वत:चा विचार करणारी, तिच्या हक्कासाठी बोलणारी, अनेकदा स्वार्थीपणे वागणारी, इतरांना दुखावणारी अशी तिची व्यक्तीरेखा आहे. संजनाचे पात्र नकारात्मक वाटत असले तरी रुपाली भोसलेने ज्या पद्धतीने ते साकारले त्याचे कौतुक होताना दिसते.

एखादी महिला घरात काम करते म्हणजे तिला बाहेरच्या जगातलं काही समजत नाही, असे अरुंधती आणि अनिरुद्धचे पात्र दाखवले गेले. मात्र, कुटुंबाच्या आवडी निवडीप्रमाणे जगणारी आणि त्याच कुटुंबासाठी स्वत:च्या अस्तित्वाला मागे सोडणारी अरुंधती वेळप्रसंगी खंबीर होते. बंधनातून मुक्त होत स्वत:चे वेगळे आयुष्य निर्माण करते. बाहेरच्या जगात वेगळी ओळख बनवते. आता ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा: Video: ‘बिग बॉस’मधील लाडक्या जोडीच्या लग्नाला झालं एक वर्ष पूर्ण; अमृता देशमुख-प्रसाद जवादे यांनी शेअर केला खास व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रुपाली भोसले तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळेदेखील चर्चेत असलेली दिसते. नुकतीच तिने कार घेतली आहे. त्याआधी तिने तिच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. आता या मालिकेनंतर रुपाली कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.