‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळी व्यक्त होताना दिसत आहेत. ‘आई कुठे काय कर’ते मालिका संपल्यानंतर संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेला कोणाची आठवण येईल? जाणून घ्या…

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रुपाली भोसलेने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी रुपालीला मालिका संपल्यानंतर कोणाची आठवण येईल? असं विचारलं. तेव्हा रुपाली म्हणाली, “याचं उत्तर तुम्हाला माहित आहे. कधी ते लपलेलं नाही. अरुंधतीबरोबर ऑफ कॅमेरा जे काही असलं तरी तितकं आम्ही दररोज नसतो. तिचे जेव्हा केळकर घरात सीन असायचे तेव्हा ती दुसऱ्या ठिकाणी असायची. समृद्धी बंगल्यावर मारामारीचे, वादविवादाचे सीन असतात. त्यामुळे आम्ही बसून खूप गप्पा मारल्या नाहीयेत. तो सीन झाल्यानंतर आम्ही दोघींपण अशा जरा थांब, स्पेस आउट, असं म्हणून बाजूला व्हायचो.”

हेही वाचा – Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

पुढे रुपाली भोसले म्हणाली की, या सेटवरच्या एका व्यक्तीला मीस करायचं म्हटलं तर मिलिंद गवळी सर आहेत. म्हणजे अनिरुद्ध देशमुख. त्यांच्याशी जितक्या गप्पा झाल्यात, त्यांच्याशी जितकी विचारांची देवाणघेवाण झालीये. एकंदरीत सगळ्याचं पातळीवर. भावनिक, मानसिक, प्रोफेशनल, पर्सनल, जेवढ्या सगळ्या त्यांच्याबरोबर गोष्टी शेअर झाल्यात. तितक्यात इथे कोणाबरोबर शेअर केल्या, असं मला वाटतं नाही. एक गौरी होती. गौरीनंतर मिलिंद सर आहेत. माझ्या मते त्यांची जास्त आठवण येईल. बाकी नाही. मला नाही वाटतं, मला इतर कोणाची आठवण येईल.

हेही वाचा – Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित

हेही वाचा – Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.