मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर सईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. चित्रपटाबरोबर सई आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. दरम्यान, सईच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी विनोदी कार्यक्रमाचे सई परीक्षण करते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमात ती दिसली नाही. तिच्या जागी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हास्यरसिक ही जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. आता सई नेमकी कुठे आहे याबाबत प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे. दरम्यान, सईने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- “विकीला माझ्याशी लग्न करायचे नव्हतेच, कारण…”; अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा, म्हणाली, “त्याला…”

सईने हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करीत तिने लिहिले, “मी वेब शो शूट करतेय म्हणून मी माझा खास शो महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि त्यातली द चेयर मिस करतेय.” सोशल मीडियावर सईची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टवरून सई एका वेब सीरिजच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याचे समोर आले आहे. अद्याप या वेब सीरिजचे नाव जाहीर करण्यात आले नसले तरी प्रेक्षकांना या वेब सीरिजबाबत उत्सुकता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सईच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीबरोबर बॉलीवूडमध्येही सईने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. २ फेबुवारीला तिचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भूमिका आहे. प्रेक्षकांचाही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.