Salman Khan met Pankaj Dheer son Nikitin Dheer :’महाभारत’ फेम पंकज धीर यांचं कॅन्सरमुळे ६८ व्या वर्षी निधन झालं. पंकज यांनी एकदा कॅन्सरवर मात केली होती. पण त्यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण पंकज यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

पंकज धीर हे त्यांचा उत्तम अभिनय व भारदस्त आवाजासाठी ओळखले जायचे. पंकज यांनी ‘सडक’, ‘सोल्जर’ आणि ‘बादशाह’ यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण त्यांना खरी लोकप्रियता १९८८ च्या ऐतिहासिक ‘महाभारत’ मालिकेमुळे मिळाली. ‘महाभारत’मधील कर्णाच्या भूमिकेमुळे पंकज धीर यांना प्रसिद्धी मिळाली.

पंकज धीर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पंकज यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक बॉलीवूड स्टार आले होते. सलमान खान, अरबाज खान पंकज धीर यांच्या अंत्यसंस्काराला आले. सलमान खानने पंकज यांचा मुलगा निकितिन धीरची भेट घेतली. निकितनला मिठी मारून धीर दिला. तिथे निकितिनची पत्नी कृतिका सेंगरदेखील होती. सासऱ्यांच्या निधनाने कृतिकाला धक्का बसलाय.

पाहा व्हिडीओ

पंकज धीर यांच्या पार्थिवाला निकितिन धीरबरोबर अभिनेता कुशाल टंडनने खांदा दिला. कुशाल टंडनचा पंकज धीर यांच्या अंत्यसंस्कारातील व्हिडीओ व्हायरल झाला.

पंकज धीर यांनी ‘ससुराल सिमर का’ मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत मुख्य भूमिका करणारी दिपीका कक्कर व शोएब इब्राहिम यांनीही पंकज यांचे अंत्यदर्शन घेतले. पंकज धीर यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पंकज धीर यांच्या पत्नीचे नाव अनिता धीर आहे. पंकज यांना एक मुलगा आहे. तो पंकज यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आला.

निकितिनने २००८ मध्ये ‘जोधा अकबर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर त्याने नागार्जुन – एक योद्धामध्ये अस्तिक ही भूमिका केली होती. तर २०२४ मधील श्रीमद रामायणमध्ये त्याने रावणाचे पात्र साकारले होते. निकितिनने त्याच्या करिअरमध्ये ‘रेडी’ (२०११), ‘चेन्नई एक्स्प्रेस’ (२०१३), ‘कांचे’ (२०१५), ‘शेरशाह’ (२०२१) आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकरल्या. तसेच त्याने रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ (२०२४) या सीरिजमध्येही काम केलं होतं.