‘झी मराठी’वरच्या ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे ‘सारं काही तिच्यासाठी’. या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी निशी मुंबईला जात असल्याचा सीक्वेन्स मालिकेत चालू आहे.

उमा रघुनाथरावांकडे निशी, ओवी आणि श्रीनूला मुंबईला जाण्यासाठी परवानगी मागते. लेकीच्या स्वप्नांसाठी उमाने विनंती केल्यावर दादा खोत निशी आणि श्रीनूला मुंबईची जाण्याची परवानगी देतात. परंतु, दोघंही मुंबईला गणपती मंदिरात एकत्र गणरायाचा अभिषेक करतील हा यामागचा दादा खोत यांचा विचार असतो. दादांकडून होकार मिळाल्यावर निशी, ओवी, श्रीनू मोठ्या आनंदात कॅम्पसाठी जायला निघतात.

हेही वाचा : Video : अंशुमन विचारेने खरेदी केलं नवीन घर! व्हिडीओ शेअर करत दाखवली पहिली झलक; म्हणाला, “लवकरच…”

मुंबईत नीरज, निशी, श्रीनू आणि ओवी मुंबई मधल्या विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देतात. चौघेही एकत्र वेळ घालवतात, हा वेळ घालवत असताना, नीरज एकांतात निशीजवळ आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करतो. नीरजच हे रूप पाहून निशी आश्चर्यचकित होते. तर दुसरीकडे ओवी सुद्धा श्रीनूच्या अत्यंत प्रेमात असते. पण हे सगळं होत असताना रघुनाथराव व उमाईने निशी-श्रीनू यांना मुंबईत गणपतीच्या मंदिरात जाऊन जो अभिषेक करायला सांगितलाय तो अभिषेक अनावधानाने ओवी आणि श्रीनूच्या हातून होतो.

हेही वाचा : वैवाहिक बलात्काराच्या सीनबद्दल बॉबी देओल स्पष्टच बोलला; म्हणाला “अ‍ॅनिमल लोकांना जागरूक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता काय होणार जेव्हा उमा आणि रघुनाथ पर्यंत ही बातमी पोहोचणार का? स्वप्ननगरीत निशी आणि ओवीचे स्वप्न सत्यात अवतरले का? या सगळ्या गोष्टी ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.