‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडेने साकारलेल्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने आज नवऱ्याबरोबर लग्नानंतरची पहिली धुळवड साजरी केली. याचा व्हिडीओ तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री तितीक्षा तावडेने २६ फेब्रुवारीला अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात, पारंपरिक पद्धतीत तितीक्षा व सिद्धार्थचा लग्नसोहळा झाला. आज लग्नानंतरची पहिली धुळवड दोघं खेळले.

हेही वाचा – Video: “दुसरी जया बच्चन”, प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ कृती पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले..

तितीक्षाने धुळवडीच्या फोटोंचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “तू माझ्या आयुष्यात खरे रंग भरलेस.” तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नानंतरच्या या पहिल्या धुळवडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

तितीक्षा व सिद्धार्थच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघांना लग्नानंतरच्या पहिल्या धुळवडीच्या शुभेच्छा नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: बायकोला पाण्याच्या टाकीत बसवलं अन् बेभान…, शाहरुख खानच्या होळी सेलिब्रेशनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तितीक्षा दररोज ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर सिद्धार्थ लवकरच ‘जेएनयू’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थसह उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रश्मी देसाई असे अनेक कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये सिद्धार्थचा दमदार अंदाज पाहायला मिळाला. ५ एप्रिलला सिद्धार्थचा ‘जेएनयू’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.