‘बिग बॉस १६’ मधील स्पर्धक शालीन भानोत सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची पूर्वाश्रमीची पत्नी दलजीत कौर आता दुसरं लग्न करणार असून नुकताच तिचा साखरपुडा झाला. ती लवकरच लंडनमधील बिझनेसमन निखिल पटेलशी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच नेटकर यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. आता त्यावर दलजीतने भाष्य करत तिने दुसरं लग्न करण्याचा निर्णय का घेतला हे सांगितलं आहे.

दलजीत आणि निखिल मार्च महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. ‘बॉलिवूड टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “सप्टेंबर महिन्यात एका पार्टीमध्ये मी निखिलला पहिल्यांदा भेटले. पण त्याआधीही मी काही जणांना डेट केलं आहे. तेव्हा माझा मुलगा मला नेहमी विचारायचा की “आई, तू लग्नासाठी मुलगा शोधतेस का?” जेडन त्याच्या वयाच्या मानाने खूप समजूतदार आहे. वडिलांच्या प्रेमासाठी आसुसला होता. त्याला एक चांगले वडील आणि मला चांगला जीवनसाथी मिळावा अशी माझी इच्छा होती. पण तरीही मला आतून एक भीती वाटत होती कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न होता.”

आणखी वाचा : सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाबाबत एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टची प्रतिक्रिया, म्हणाली…

पुढे ती म्हणाली, “जेडन जेव्हा निखिलला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने निखिलला ‘बाबा’ अशी हाक मारली होती. तेव्हा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्याने बाबा अशी हाक मारल्यावर निखिलला कसं वाटेल याची मला चिंता होती. पण काही वेळातच त्या दोघांमध्ये छान बॉन्डिंग तयार झालं. ते पाहून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

हेही वाचा : दुसरं लग्न करणार शालीन भानोतची पूर्वाश्रमीची पत्नी, बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला साखरपुडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दलजीत कौर आणि अभिनेता शालीन भानोत यांचं लग्न २००९ साली झालं होतं. २०१३ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी दोघांमध्ये बरेच वाद होते. तर त्यानंतर जवळपास १० वर्षांनी दिलजीत आता पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे.