Shark Tank India Judge with net worth of Rs 720 Crore: ‘शार्क टँक इंडिया’हा लोकप्रिय शो आहे. जिथे देशभरातील विविध उद्योजक या शोमध्ये हजेरी लावतात. या शोच्या परीक्षक पदी असलेले परीक्षकदेखील विविध अडचणींवर मात करत त्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय सुरू केला आहे.
अनुपम मित्तल ज्या अमेरिकेच्या कंपनीत काम करत होते, ती कंपनी बुडाली आणि त्यांना त्यांची संपूर्ण बचत गमवावी लागली. तर रितेश अग्रवाल यांना अनेक गुंतवणूकदारांकडून नकार सहन करावा लागला होता. आता अमन गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य केले.
“मला आता जे यश मिळाले आहे ते माझ्या मेहनतीचे…”
अमन गुप्तांनी खुलासा केला की जेव्हा त्यांनी सीएची नोकरी सोडली. त्यानंतर ते अनेक वर्षे फारशी चांगली कमाई करत नव्हते. ज्यावेळी त्यांनी त्यांच्या उद्योगावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले, तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना आर्थिक मदत केली असे वक्तव्य त्यांनी केले.
अमन गुप्ता यांनी प्रखर के प्रवचन या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीत तो म्हणाला की मी कधीही कोणाचेही ठरवून नुकसान केले नाही. अमन गुप्ता म्हणाले, “मला आता जे यश मिळाले आहे ते माझ्या मेहनतीचे आणि मी केलेल्या त्यागाचे फळ आहे. मला देवाची भीती वाटते. मला भीती वाटते जर मी कोणाबरोबर वाईट वागलो, तर देव मला शिक्षा देईल. मी कधीही कोणाचेही ठरवून नुकसान केले नाही. मला वाटते की मला जितके मिळायला पाहिजे होते, त्यापेक्षा मला जास्त मिळाले आहे.”
अमन पुढे म्हणाला, “देवाची माझ्यावर कृपा आहे. पण,याचा अर्थ असा नाही मला मी हुशार नाही. मी खूप मेहनत केली आहे. मी बसने प्रवास केला आहे. मी बसमध्ये पहिल्या स्टॉपला बसायचो. कारण मला दोन तास झोपायचे असायचे किंवा अभ्यास करायचा असे. मी १६ तास काम करायचो. मी अनेक जॉब बदलले आहेत. माझे सगळे मित्र चांगल्या ठिकाणी काम करत होते. माझ्या वयाच्या ४० वर्षांपर्यंत माझ्या आर्थिक गरजांसाठी मी माझ्या पत्नीवर अवलंबून होतो.”
मुलगी मोठी होताना तो तिच्याबरोबर वेळ घालवू शकला नाही ते अनेक गोष्टींचा त्याने जो त्याग केला, त्याचा त्याला पश्चाताप वाटत नसल्याचे त्याने म्हटले. अमन गुप्ता म्हणाला, “मी जर ते त्याग केले नसते, तर आज मी जिथे आहे तिथे नसतो. मी मेहनत केली पण मी गाढवासारखी मेहनत केली नाही. देवाने मला मेंदू दिला आहे, मी त्याचा वापर केला.”
तसेच वडिलांनीदेखील कायमच पाठिंबा दिल्याचे त्याने सांगितले. ते दिवाळी गिफ्ट म्हणून माझ्या बोट कंपनीचे प्रॉडक्ट विकत घ्यायचे आणि इतरांना दिवाळी गिफ्ट म्हणून द्यायचे. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, अमन गुप्ता ७०० कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे. त्याने प्रिया डग्गरशी लग्न केले आहे.