Marathi Actress Sharmila Shinde : गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणपतीचा सण साजरा केला जातो. मात्र, काही नामांकित मंडळांमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जात असल्याने अनेकदा गालबोट लावणाऱ्या घटना घडतात. सध्या सोशल मीडियावर याचेच काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भक्तांना चुकीची वागणूक देणं, त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणं याबाबत सध्या अनेकजण आवाज उठवत आहेत. ‘पंड्या स्टोअर’ फेम अभिनेत्री सिमरन बुधरूपने देखील यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रकरणावर आता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतील अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत दुर्गा जहागीरदारचं पात्र साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदेने ( Sharmila Shinde ) यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. शर्मिलाने देव सर्वत्र आहे त्यामुळे घरी बसून बाप्पाची पूजा करा असं आवाहान भाविकांना केलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “संग्रामची शक्ती खूप कमी पडली…”, अरबाजच्या युक्तीचं आणि खेळाचं पहिल्यांदाच कौतुक; तिसऱ्या पर्वातील सदस्याची पोस्ट चर्चेत

शर्मिला शिंदेची पोस्ट ( Sharmila Shinde )

मी लहान होते तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतींचं दर्शन घडवायची. गर्दीत चेंगरत चेंगरतच दर्शन घ्यायचो आम्ही सुद्धा… पण, आता मी एक कलाकार आहे. मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते. इतरांनी ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही तिथे जाणं टाळा. देव सर्वत्र आहे. घरी बसून नमस्कार करा. आपला माणुसकीचा कोटा (Quota) high ठेवा. आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. त्यांची म्हातारपणी सेवा करा. माणसांसाठी आणि इतर प्राणिमात्रांसाठी मनात दया-माया असुद्या. दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा. बास! यापेक्षा मोठी भक्ती काय असेल. गणपती बाप्पा मोरया!

PS : जी मंडळं भाविकांना नीट वागवतात तिथे भाविकांनी सुद्धा सहकार्य करावे.

हेही वाचा : “अभी तो खेल शुरु हुआ हैं…” म्हणत विशाखा सुभेदारने पंढरीनाथ कांबळेचं केलं कौतुक, म्हणाली, “अंदाजे तुझं वय वर्षे ५२ असावं, पण…”

हेही वाचा : ‘मन धागा-धागा जोडते नवा’ फेम मयुरी देशमुखला गणेशोत्सवातील ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही, म्हणाली, “माझ्या घरात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Sharmila Shinde
शर्मिला शिंदेच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Sharmila Shinde )

दरम्यान, शर्मिलाने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखली सहमती दर्शवली आहे. “अगदी बरोबर…”, “देव सर्वत्र आहे…”, “बरोबर बोललीस ताई तू” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.